साखरपुड्यात पाहायला मिळाला क्रिकेटचा फिव्हर;

साखरपुड्यात पाहायला मिळाला क्रिकेटचा फिव्हर;

belgavkar.com | belgaum | belgavkar

भर कार्यक्रमात पाहुण्यांसाठी स्क्रीनवर लावली लाईव्ह क्रिकेट मॅच

साखरपुड्याच्या कार्यक्रमात लावल्या जाणाऱ्या मोठ-मोठ्या स्क्रीन्सवर आजवर आपण जोडप्यांचे सुंदर फोटो, व्हिडीओ किंवा काही वेळा चित्रपटातील गाणी, डान्स पाहिले असतील. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात लावलेल्या स्क्रीनवर चक्क भारतीय संघाची लाईव्ह क्रिकेट मॅच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही तर साखरपुड्याचे सूचसंचालन करणारी व्यक्तीही क्रिकेट कॉमेंट्री करत आलेल्या पाहुण्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. यामुळे साखरपुड्यात आलेल्या पाहुण्यांमध्येही क्रिकेटचा वेगळाच फिव्हर पाहायला मिळाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका स्टेजवर साखरपुड्याचे विधी सुरू आहेत. नवरा-नवरीच्या घरातील पाहुणे मंडळी स्टेजवर विधीत मग्न आहेत. पण, समोर बसलेली पाहुणे मंडळी चक्क मॅच बघण्यात व्यस्त झाली आहेत. साखरपुड्याच्या स्टेजच्या बाजूच्याच स्टेजवर एका भल्यामोठ्या स्क्रीनवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा लाईव्ह सामना सुरू होता. इतकंच नाही, तर साखरपुडा सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारी महिला चक्क क्रिकेट कॉमेंट्रीही करताना दिसली. त्यामुळे या हटके साखरपुडा सोहळ्याची आता खूप चर्चा होत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या कमेंट बॉक्समध्ये भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, या लग्नासाठी मला जायचे आहे; पक्का हे लोकं मॅचच्या दिवशीच लग्न सोहळा आयोजित करतील. अशाप्रकारे लोक वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

icc mens cricket world cup 2023 cricket engagement ceremony live cricket match screened

engagement ceremony live cricket match

Cricket World Cup : Free tickets coupons on offer

साखरपुड्यात पाहायला मिळाला क्रिकेटचा फिव्हर;
भर कार्यक्रमात पाहुण्यांसाठी स्क्रीनवर लावली लाईव्ह क्रिकेट मॅच

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm