Video : दिवाळीत पाऊस की पावसात दिवाळी...!

Video : दिवाळीत पाऊस की पावसात दिवाळी...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे हाल… @कर्नाटक

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली

कर्नाटक : बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अगदीच सामान्य आहे. अनेकदा सोशल मीडियावर वाहतूक कोंडीच्या अनेक मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात. हेलिकॉप्टरमुळे ट्रॅफिक जाम होणे किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलं म्हणून लॅपटॉप उघडून काम करणे, अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. तर सोमवारपासून बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे आणि सोशल मीडियावर प्रत्येक जण त्यांच्या विभागातील फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.
दिवाळीला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहरात विविध परिसरात रस्ते तुडुंब भरले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी अंदाज व्यक्त केला आहे की, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 9 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगळुरू रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी :
बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगळुरू रहिवाशांनी सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत, ज्यात लोक गुडघाभर पाण्यातून प्रवास करताना दिसून आले आहेत. मल्लेश्वरम, शांतीनगर, म्हैसूर बँक आणि टाऊन हॉलसह अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. अनेक प्रवासी गुडघाभर पाण्यातून त्यांच्या दुचाकी ओढत घेऊन जाताना दिसले आहेत. तसेच चारचाकी वाहनचालक पाण्यातून गाडी चालवत घेऊन येताना दिसले.
सोशल मीडियावर ही पोस्ट @citizenmoment या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे; यात तुम्हाला कशाप्रकारे बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने बंगळुरू रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे हे दिसून येईल. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने आपल्या हवामान अहवालात म्हटले आहे की, राज्यात 9 नोव्हेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो आणि त्यानंतर तो कमी होईल. बंगळुरू रहिवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मदत घेत शहरातील पाणी साचणे या समस्येवर तक्रारी करताना पोस्ट शेअर केल्या आहेत.

Heavy rain floods areas in Bengaluru

Heavy Rains In Bengaluru : Spark Flooding Traffic Snarls

Torrential rains pound Bengaluru

Video : दिवाळीत पाऊस की पावसात दिवाळी...!
मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे हाल… @कर्नाटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm