भाजपाच्या त्या आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार VIDEO

भाजपाच्या त्या आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार VIDEO

चॅम्पियन आणि त्याचे सहकारी आमदाराच्या घरी....

On Camera, MLA vs Ex-MLA in Uttarakhand, Arrested After Shots Fired

Uttarakhand political turmoil : Ex-BJP MLA 'Champion' arrested after violent attack on rival's home : @उत्तराखंड @हरिद्वार : माजी आमदार आणि भाजपा नेते कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन यांनी रविवारी खानपूरचे आमदार उमेश कुमार यांच्या रुरकी येथील निवासस्थानावर गोळीबार केला. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली (Khanpur MLA in Roorkee of Haridwar).
uttarakhand-bjp-former-mla-arrested-for-opening-fire-at-mlas-house-202501.jpeg | भाजपाच्या त्या आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार VIDEO | belgaum news | belgavkar बेळगावकर
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
वरिष्ठ पोलीस अधीक्षक (हरिद्वार) परमेंदर डोभाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या निवासस्थानासमोर ही घटना घडली. “आम्हाला सोशल मीडियावरील क्लिपद्वारे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातून माजी आमदाराने (Former BJP MLA from Laksar Kunwar Pranav Singh) आमदाराच्या घरावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. माजी आमदार आणि त्यांच्या साथीदारांना आम्ही अटक केली आहे. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू”, असं डोभाल म्हणाले. एसएसपीने सांगितले की, दोन्ही पक्षांनी तक्रारी दाखल केल्यानंतर क्रॉस एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
“आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. दोन्ही पक्षांवर आरोप आहेत आणि आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. माजी आमदाराने वापरलेली बंदूक परवानाधारक आहे की नाही हे आम्ही तपासत आहोत” असंही ते म्हणाले.
निघून जातानाही त्यांनी केला गोळीबार
व्हिडिओमध्ये चॅम्पियन आणि त्याचे सहकारी आमदाराच्या घरी अनेक वेळा गोळीबार करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांनी घरावर दगडफेकही केली. निघून जाण्याआधी कारमध्येमध्ये बसण्याआधी त्यांनी पुन्हा त्यांच्या घरावर गोळीबार केला. सत्ताधारी भाजपाने या घटनेवर चिंता व्यक्त केली, तर विरोधी काँग्रेसने आमदाराच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना राज्यातील “कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली” अशी टीका केली.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
भाजपाची भूमिका काय? : भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट म्हणाले की, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा प्रकारची कृत्ये थांबली पाहिजेत. जो कोणी असे वातावरण निर्माण करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे”, असे गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रवक्ते शीशपाल सिंह बिश्त म्हणाले की, हा प्रदेश रणांगणात बदलला असून यावरून राज्यातील अराजकता दिसून येते. काँग्रेसने उत्तराखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव असल्याचे सातत्याने निदर्शनास आणले आहे. खानपूरमध्ये, आजी-माजी आणि विद्यमान आमदार उघडपणे शाब्दिक शिवीगाळ करत आहेत, त्यांच्या टोळ्यांसोबत घातक शस्त्रे उगारत आहेत आणि एकमेकांना धमक्या देत आहेत. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत, तर पोलीस केवळ प्रेक्षक राहिले आहेत”, असा बिश्त यांनी आरोप केला.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Uttarakhand Bjp Former Mla Arrested For Opening Fire At Mlas House

Former BJP MLA from Laksar Kunwar Pranav Singh

Ex BJP MLA Champion arrested

भाजपाच्या त्या आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार VIDEO
चॅम्पियन आणि त्याचे सहकारी आमदाराच्या घरी....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm