खूपच धक्कादायक आणि... व्हायरल डीपफेक व्हिडिओ; पहिल्यांदाच बोलली रश्मिका मंदाना, पोस्ट चर्चेत

खूपच धक्कादायक आणि... व्हायरल डीपफेक व्हिडिओ;
पहिल्यांदाच बोलली रश्मिका मंदाना, पोस्ट चर्चेत

belgavkar.com | belgaum | belgavkar

असा एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्यामुळं एकच खळबळ

साऊथ इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक deepfake व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटींनी भाष्य केल्यानंतर आता स्वतः रश्मिकानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अधिक विकसीत होत आहे, पण याचा चुकीचा वापर होतोय, असं तिनं म्हटलं आहे. तसंच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मित्रमंडळी, कुटुंबिय, तसंच चाहते तिच्यासोबत उभे होते, यासाठी तिनं सगळ्यांचे आभार मानले आहेत. तसंच हा व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ खूपच विचित्र, भयानक होता, हे देखील तिनं म्हटलं आहे.
रश्मिकानं लिहिलं की, मला खूप वाईट वाटतंय. पण मला ऑनलाइन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओ बद्दल बोलावच लागेल. खरंच सांगते, की हा डीपफेक व्हिडिओ माझ्यासाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच एक भीतीदायक असा प्रकार आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळं आज आपलं खूप काही नुकसान होत आहे.
आज मी एक महिला म्हणून, अभिनेत्री म्हणून सगळ्यांचे आभार मानते, त्यांनी मला अशा अवघड काळात मला सपोर्ट केला. पण हेच माझ्यासोबत शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना झालं असतं तर, मी काय केलं असतं... मी सगळं कसं हाताळलं असतं, याचा विचारही करवत नाही. अशा प्रकाराला आणखी लोक बळी पडतील, त्याआधीच यावर तोडगा काढायला हवा. यावर लक्ष देण्याची गरज आहे, असंही रश्मिकानं म्हटलं आहे.
काय घडलंय नेमकं?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा वापरण्यात आलाय. एक डिप नेक ड्रेस घातेलली महिला लिफ्टमध्ये येताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली असून मूळ व्हिडिओ हा एका ब्रिटिश-भारतीय महिलेचा आहे. विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून तिथं रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. दरम्यान, रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Rashmika Mandannas viral deepfake video sparks calls for legal framework

Rashmika Mandanna Slams Viral Deepfake Video

Fake video of Rashmika Mandanna goes viral on internet

Rashmika Mandannas viral video is an AI deepfake

खूपच धक्कादायक आणि... व्हायरल डीपफेक व्हिडिओ; पहिल्यांदाच बोलली रश्मिका मंदाना, पोस्ट चर्चेत
असा एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्यामुळं एकच खळबळ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm