बेळगाव—belgavkar : दोघा अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. फरहान रियाजअहंमद दालायत (वय 22, रा. न्यू गांधीनगर) व जुबेर अहंमद अब्दुलरशीद दालायत (25, रा. उज्ज्वलनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
उपरोक्त दोघा संशयितांनी 19 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी अमननगर येथे घरफोडी केली होती. या प्रकरणी माळमारुती पोलिसांकडून नोंद करून घेत चोरट्यांचा शोध सुरू होता. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, रहदारी व गुन्हे विभागाचे डीसीपी निरंजन अर्स, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी या चोरट्यांना अटक केली.
या कारवाईत उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी, उदय पाटील यांच्यासह एम. जी. कुरेर, सी. जी. चिन्नप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, बसवराज कल्लप्पन्नवर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, मल्लिकार्जुन गाडवी, महेश ओडेयर, रमेश अक्की, महादेव काशीद यांनी सहभाग घेतला.