सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तसेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या माध्यमामुळे लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी मदतही होत असते. मित्र मैत्रीण, नातेवाईक, प्रियजन एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत. हे असे असलं तरी सोशल मीडियाच्या सकारात्मक परिणांमासोबतच त्याचे नकारात्मक परिमाणही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाचा सर्वात मोठा फटका हा नातेसंबंधांवर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामुळे घटस्फोट घेणाऱ्याची दाम्पत्यांची संख्याही ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
सोशल मीडियाच्या अल्गोरिदमनं बदललं आपलं ऑनलाईन आयुष्यबेळगाव—belgavkar—belgaum : सोशल मीडियाच्या या युगात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बेळगावच्या रामदुर्ग तालुक्यातील एका विवाहितेचे धारवाड तालुक्यातील एका युवकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुत जुळले. मात्र त्या युवतीने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. श्वेता गुडदापूर (वय 24, रा. रामदुर्ग) असे त्या विवाहितेचे नाव आहे.
श्वेता हिचा विवाह रामदुर्ग येथील विश्वनाथ याच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर काही महिन्यांतच सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवहळ्ळी (ता. धारवाड) येथील युवकाशी तिचे प्रेम जडले. त्यानंतर ती आपल्या पतीला सोडून त्या युवकाबरोबर धारवाडच्या श्रीनगर येथे राहू लागली.
धारवाड येथे एका भाडोत्री घरात ती रहात होती. दरम्यान तिची आई आणि पती विश्वनाथ याने तिथे जाउन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तिच्या प्रियकराने या दोघांना धमकी देउन माघारी धाडले. या घटनेनंतर काही दिवसांतच श्वेताने धारवाड येथील घरात आत्महत्या केली. याप्रकरणी श्वेताची आईने धारवाड पोलिस स्थानकामध्ये फिर्याद दिली आहे.पतीला सोडून दुसऱ्याशी थाटला होता संसार