Neeraj Chopra gets married in dreamy ceremony, shares first photos : Bound by love : भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने नव्या वर्षात लग्नाचा बार उडवून दिलाय. भालाफेकपटू नीरज चोप्रानं कोणताही गाजावाजा न करता थेट लग्नाचे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत (Two-time Olympic medallist Neeraj Chopra).
नीरज चोप्रा याच्या पत्नीचं नाव हिमानी असं आहे. नीरज चोप्रानं रविवारी 19 जानेवारीला आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आयुष्यातील खास क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात करतोय, या कॅप्शनसह फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांसोबत लग्नाची गोष्ट शेअर केली आहे.