बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात पूजा, अभिषेक केला. डीके हे भगवान महाकाल आणि कालभैरव यांचे भक्त आहेत.
कर्नाटकातील सत्तावाटपाबाबतच्या विविध चर्चांमुळे तेथील राजकारणही तापले आहे. डीके शिवकुमार यांना काँग्रेसचे चाणक्य मानले जाते. यातचं जागृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मंदिरात त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून पूजा अर्चा केली आहे. श्री कपिलेश्वर मंदिरात देखील त्यांनी महादेवाला 111 लिटर दुधाचा आणि पंचामृताचा अभिषेक करून प्रार्थना केली आहे.
सध्या डी. के. शिवकुमार बेळगावात काँग्रेस पक्षाच्या 'जय बापू, जय भीम आणि जय संविधान' कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगावात आहेत.
मला आणि कर्नाटकसह भारताला समृद्धी मिळावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. सर्वजण आनंदी रहा.