बेळगाव  : कत्तलखान्याला नेत असलेल्या गाई-वासरांची हिंदू कार्यकर्त्यांनी केली सुटका

बेळगाव : कत्तलखान्याला नेत असलेल्या गाई-वासरांची हिंदू कार्यकर्त्यांनी केली सुटका

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : महाराष्ट्रातून बेळगावमधील कत्तलखान्याला नेत असलेल्या जनावरांचे वाहन श्रीराम सेना, हिंदूराष्ट्र सेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंडलगा कलमेश्वर मंदिराजवळ आज अडविले. यातील गाय व सहा वासरांना कोंडूसकोप्प येथील महावीर गोशाळेत पाठवून दिले. चारचाकी वाहन महाराष्ट्रातून बेळगावातील कत्तलखान्याला जनावरे घेऊन येत असल्याची माहिती बजरंग दल व श्रीराम सेना, हिंदूराष्ट्रच्या कार्यकर्त्यांना समजली.
या वाहनांची कलमेश्वर मंदिरजवळ अडवणूक करण्यात आली. यावेळी चालकाला जाब विचारुन पोलिसांनाही पाचारण केले. वाहनातील सर्व गायी बाहेर काढून दुसऱ्या वाहनांतून महावीर गोशाळेत पाठवून दिल्या. वाहनचालक मात्र वाहन घेऊन फरार झाला. या वाहनात गाय व 10 ते 12 दिवसांची वासरे होती. या वेळी रवीकुमार कोकीतकर, सचिन भादवणकर, नरू निलजकर, विकास चव्हाण, विनय हंगीरगेकर, करण पाटील, सचिन तुप्पट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कत्तलखान्याला नेत असलेल्या गाई-वासरांची हिंदू कार्यकर्त्यांनी केली सुटका

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm