बेळगाव : गावात अंदर-बाहर जुगार खेळणार्या 5 जुगार्यांना अटक

बेळगाव : गावात अंदर-बाहर जुगार खेळणार्या 5 जुगार्यांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : तारिहाळ (ता. बेळगाव) गावातील मारूती मंदिराच्या आवाराजवळ अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या 5 जुगाऱ्याना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे. राजू चंद्राप्पा परमाज (वय 30, रा. चंदनहोसूर) व तारिहाळ गावातील संतोष कल्लाप्पा मुचंडी (वय 28), मल्लाप्पा गंपाप्पा तळवार (वय 30), ईश्वरलिंग हुल्ल्याप्पा सन्नतम्मण्णवर (वय 24), सिध्दराम नागाप्पा मेलीनमणी (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी अंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून या पाच जणांना अटक केली. त्याच्या जवळून 41 हजार 80 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सर्व पाच जणांवर कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गावात अंदर-बाहर जुगार खेळणार्या 5 जुगार्यांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm