बेळगाव : वडगावच्या 'या' मंदिरात चोरी; चोर्यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर

बेळगाव : वडगावच्या 'या' मंदिरात चोरी;
चोर्यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरासह जिल्ह्यात धार्मिक स्थळांमधील चोर्यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर
जिल्ह्यात अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोर्‍यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर आणली आहे. अलिकडच्या काळात अनेक मंदिरांमधून रोख रुपये, देव-देवतांचे साहित्य चोरीला गेले असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. संभाजीनगर वडगाव येथील मंदिरात चोरट्यांनी देवाच्या मूर्तीवरील चांदीचा किरीट लंपास केला आहे. वडगाव येथील श्री सार्वजनिक गणेश मंदिरात चोरीचा हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत परिसरात खळबळ माजली असून चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे. सध्या शहर आणि उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठेवले आहे. घरफोड्या चोऱ्या याचबरोबर दरोडे सारखे प्रकार घडत आहेत.
अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोरीच्या घटना अशा आहेत.
मोदगा गावातील दोन मंदिर
येळ्ळूर येथील दोन मंदिरे
मुचंडी गावातील मंदिर
मंडोळी येथील मंदिर
कलखांब येथील महालक्ष्मी मंदिर
त्यामुळेच भविष्यकाळात मंदिर विश्‍वस्त संस्था व नोंदणी न झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन संस्थांनी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
वडगाव येथे यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
याकडे पोलिसांनी लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. श्री सार्वजनिक गणेश मंदिर व सांस्कृतिक ट्रस्ट येथे असलेल्या मूर्तीच्या किरीटाची चोरी करण्यात आली आहे. याचबरोबर शहर आणि परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून आता चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मंदिरातील जमा होणारी देणगी, दानपेट्या, देवतांचे दागदागिने, सोन्या चांदीच्या वस्तू यावर डोळा ठेवून चोरट्यांनी गेल्या काही काळात काही छोट्या-मोठ्या मंदिरातही डल्ला मारला आहे. त्यातील काही चोर्‍या उघड झाल्या असल्या तरी पोलिस खाते व धर्मादाय आयुक्त यांच्या सूचनांनंतरही संबंधित मंदिर व्यवस्थापनांनी चोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचेच मंदिरातील चोरी प्रकरणातून अधोरेखित झाले असून, त्यामुळे मंदिरातील देव असुरक्षित झाले असल्याचे दिसून येते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : वडगावच्या 'या' मंदिरात चोरी; चोर्यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm