बेळगाव शहरातील जैविक कचऱ्याचे संकलन बंद करणार...

बेळगाव शहरातील जैविक कचऱ्याचे संकलन बंद करणार...

belgavkar.com | belgaum | belgavkar

हॉटेल, रेस्टॉरंट्स, मटण व चिकन विक्री दुकानांतून जैविक कचऱ्याची निर्मिती

बेळगाव शहरातील जैविक कचऱ्याच्या संकलनाची जबाबदारी महापालिका प्रशासन सोडणार आहे. महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी आयुक्तांनीच याबाबतची सूचना दिली होती. आता आरोग्य विभागाकडून या सूचनेची कार्यवाही होईल. या दोन्ही व्यावसायिकांकडून महापालिका दरवर्षी सेवाशुल्क आकारणी करते, पण महापालिकेला वाहन व सफाई कामगारांची कमतरता भासू लागली आहे. दोन वाहने व बारा सफाई कामगार या जैविक कचऱ्याची उचल करण्यात व्यस्त राहतात. त्याचा परिणाम शहर स्वच्छतेवर होत आहे. त्यामुळे हॉटेल मालक संघटना व चिकन - मटण विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जैविक कचऱ्याची उचल त्यांनाच करण्यास सांगण्यात येणार आहे.
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, मटण व चिकन विक्री दुकानांतून जैविक कचऱ्याची निर्मिती होते. सध्या महापालिकेकडून जैविक कचऱ्याची उचल होते. त्यासाठी महापालिकेने दोन वाहने व बारा सफाई कामगार तैनात केले आहेत. कचरा तुरमुरी कचरा डेपोत नेऊन त्यावर प्रक्रिया करुन कंपोस्ट खत तयार केले जाते. शहरातील हॉटेल मालक संघटना, चिकन - मटण विक्रेते संघटना यांनी महापालिकेला विनंती केल्यानंतर त्यांच्याकडील जैविक कचऱ्याची उचल महापालिकेने सुरु केली होती. वाहन व सफाई कामगारांची व्यवस्थाही त्यांनाच करण्यास सांगण्यात येईल. या कचऱ्यावर प्रक्रिया मात्र महापालिकेच्या तुरमुरीतील कचरा डेपोत होईल. त्यांच्याकडून सेवाशुल्क वसुलीही होणार आहे. कोरोना काळात हॉटेल्स व चिकन - मटण दुकाने बंद होती. त्यामुळे जैविक कचऱ्याची निर्मिती होत नव्हती.
जैविक कचऱ्याची उचल हॉटेल व रेस्टॉरंट मालक, चिकन व मटण दुकानमालकांनीच करावी, असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात लवकरच त्यांना सूचना दिली जाईल. डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी
राज्यात व बेळगावात लॉकडाउन शिथिल झाले असून हॉटेल व रेस्टॉरंटसह चिकन - मटण विक्रीची दुकानेही सुरु आहेत. त्यामुळे जैविक कचऱ्याची निर्मिती पुन्हा सुरु झाली. त्यामुळे महापालिकेने जैविक कचऱ्याची उचल सुरु केली, पण आता त्यांना ही जबाबदारी नको आहे. मात्र, हॉटेल व रेस्टॉरंट मालक, चिकन व मटण दुकानाचे मालक महापालिकेचा हा निर्णय स्वीकारणार का, असा प्रश्न आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील जैविक कचऱ्याचे संकलन बंद करणार...
हॉटेल, रेस्टॉरंट्स, मटण व चिकन विक्री दुकानांतून जैविक कचऱ्याची निर्मिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm