बेळगाव : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार तक्रार HESCOM हेस्कॉम

बेळगाव : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार तक्रार HESCOM हेस्कॉम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : विजेचा पुरवठा खंडित झाला की हेस्कॉमच्या (HESCOM) संपर्क क्रमांकाला फोन करून त्यांची तक्रार देण्यात येते. हेस्कॉमच्या प्रत्येक उपकेंद्रामध्ये तक्रार निवारण क्रमांक देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण हेस्कॉमसाठी 1912 ही हेल्पलाईन देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता हेस्कॉमने व्हॉट्सअ‍ॅपवरून (WhatsApp) तक्रारी नोंदण्यासाठी क्रमांक उपलब्ध करून दिला असून त्यावर संदेश पाठवून ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात.
कोणत्याही विजेशी संबंधित तक्रारीसाठी हेस्कॉमने 1912 ही हेल्पलाईन दिली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा ठप्प असल्याने तो क्रमांक सतत व्यस्त येतो. त्यामुळे 9480883899 या क्रमांकावर आपली तक्रार लिहून पाठवायची आहे. त्यानंतर ती तक्रार संबंधित अधिकायांकडे वर्ग करून ती सोडविली जाणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. व्हॉट्सअ‍ॅप 9480883899

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार तक्रार HESCOM हेस्कॉम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm