बेळगाव : राज्य महामार्गावर बस-क्रूझर अपघात; दोघे ठार तर तीन गंभीर जखमी

बेळगाव : राज्य महामार्गावर बस-क्रूझर अपघात;
दोघे ठार तर तीन गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. हुक्केरी : संकेश्‍वर-गोकाक राज्य महामार्गावरील झांगटीहाळजवळ (ता. हुक्केरी) बस व क्रूझरमध्ये झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. तिघे गंभीर जखमी झाले. लक्ष्मी करेण्णवर (वय 14, रा. झांगटीहाळ) तसेच बेळगाव तालुक्यातील अप्पू अलाबादी अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर जखमी झालेल्या अप्पूला घटप्रभा रुग्णालयात नेण्यात आले. पण, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
संकेश्‍वर-गोकाक राज्य महामार्गावरील झांगटीहाळ गावाजवळ मंगळवारी 6 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. संकेश्‍वरहून गोकाककडे क्रूझर जात होती. तर बस घटप्रभाहून हुक्केरीकडे येत होती. यावेळी समोरुन येणार्‍या क्रूझरला बसने धडक दिली. यामध्ये दोघे ठार झाले. तिघे गंभीर जखमी झाले. उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी पाहणी केली. हुक्केरी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राज्य महामार्गावर बस-क्रूझर अपघात; दोघे ठार तर तीन गंभीर जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm