बेळगावातील एकासह तिघांना अटक

बेळगावातील एकासह तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

गांजा पार्टी प्रकरण

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील गांजा पार्टी प्रकरणी आता तिसऱ्या संशयताला ताब्यात घेण्यात आले आहे. पार्टी सुरू असताना जिल्हा गुन्हा अन्वेषणाच्या सापळ्यात दोन तरुण सापडले होते तर तिसरा पसार झाला होता. सावंतवाडी पोलिसांनी सापळा रचून कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात त्याच्या मुसक्या आवळल्या. राहुल मारूती राठोड (19, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून तो मूळचा बेळगाव येथील आहे.
त्याच्याकडे दहा ग्रॅम गांजा, मोटरसायकल व तलवार सापडली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, यामध्ये आणखी दोन ते तीन जणांचा समावेश असल्याचा संशय पोलीस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संशयित कॅजिटल हा आपल्या घराच्या मागे असलेल्या बागेत काही युवकांना घेऊन गांजा पार्टी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला होता. कोलगाव येथे गांजा पार्टी करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कॅजिटन पिंटो (रा. कोलगाव) व सौरभ कदम (रा.ज्युस्तीननगर, सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेतले होते तर अन्य एक जण पळून गेला होता. फरार झालेल्या आरोपीच्या शोधात पोलीस होते. या पार्श्वभूमीवर ताब्यात घेतलेल्या संशयित सौरभ कदम याला सोबत घेऊन कुडाळ रेल्वे स्टेशनजवळ सोमवारी रात्री सावंतवाडी पोलीस रचला.
साध्या पेहरावात पोलीस दबा धरून होते. यामध्ये दोन पोलिस चक्क हाफपॅन्टवर होते. त्यानंतर काही वेळातच तिसरा संशयित राहुल राठोडला ताब्यात घेण्यात आले. त्याला सावंतवाडी पोलीस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी, उपनिरीक्षक खंडागळे यांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तिसरा संशयित राहूल राठोडकडे दहा ग्रॅम गांजा, मोटरसायकल व तलवार सापडली आहे. या दहा ग्रॅम गांजाची किंमत सुमारे 1500 रुपये असेल असे पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांनी सांगितले. गांजा कुडाळ येथून सप्लाय होत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आणखीही काही जणांचा यात समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून कुडाळ आणि कोलगाव येथील प्रत्येकी एक जण अशा दोघांच्या शोधात सावंतवाडी पोलीस आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.

belgaum Another arrested from Kudal in connection with ganja belgavkar बेळगाव belgaum

arrested from Kudal in connection with ganja

बेळगावातील एकासह तिघांना अटक
गांजा पार्टी प्रकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm