बेळगाव : अपघातात टिळकवाडीचा युवक ठार

बेळगाव : अपघातात टिळकवाडीचा युवक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शनिवारी मध्यरात्री बहाद्दरवाडी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात टिळकवाडी येथील युवक जागीच ठार झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकला मोटारसायकलची पाठीमागून धडक बसून हा अपघात घडला. केतन श्यामकांत नाईक (वय 27) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव असून तो बीपीसीएल कंपनीत काम करीत होता. रेशीम उद्योगासंबंधी माहिती घेण्यासाठी मोटारसायकलवरून आपल्या मित्राला भेटण्यासाठी जात असताना बहाद्दरवाडी क्रॉसजवळ थांबलेल्या ट्रकला मोटारसायकलची पाठीमागून धडक बसून हा अपघात झाला. मोटारसायकलवरून जाताना केतनने हेल्मेट परिधान केले होते. तरीही अपघातात तो जागीच ठार झाला. अपघातात हेल्मेटची काच फुटल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यक्रिया करण्यात आली. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी 9.30 वाजता आहे. केतनच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. तो एकुलता मुलगा होता. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातात टिळकवाडीचा युवक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm