बेळगाव : पतंग उडवितांना मांजाचा दोरा लागून युवक जखमी

बेळगाव : पतंग उडवितांना मांजाचा दोरा लागून युवक जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

तर दुसरीकडे पतंग उडविण्यावरून वादामुळे त्या गल्लीत दगडफेक;

बेळगाव : पतंग उडवितांना मांजा महत्त्वाचा घटक असतो. जेवढा मजबूत मांजा तेवढे पतंग उडविण्याचा आनंद अधीक असतो. शिवाय प्रतिस्पर्धीची पतंग कापण्यासाठी देखील अशा मांजाची गरज असते. चायनामेड मांजाची सध्या धूम आहे. परंतू हा मांजा अनेकांना जायबंदी करणारा ठरत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यासाठी दबाव वाढत आहे. प्रशासनाने मात्र त्याकडे अद्यापही गांभिर्याने पाहिले नाही. गांधीनगर येथे महामार्गावर पतंग मांजाचा दोरा लागून युवक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. राहुल राजगोळकर (वय 19, रा. महाद्वार रोड) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. राहुल राजगोळकर हा दुचाकीवरून NH-4 महामार्गावर जात असताना गांधीनगर ब्रिजजवळ पतंगाच्या मांजा अडकून त्याच्या गळ्यावर जखम झाली आहे. त्याने तत्काळ वाहन थांबवल्याने अपघात टळला. गळ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्याला, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या मांजावर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. बेळगाव शहरामध्ये पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाच्या दोरा लागून अनेकजण यापूर्वी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून या घटनांमध्ये वाढ होत असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.


बेळगाव शहरात मांज्यामुळे वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. मांज्याची विक्री करणाऱ्यांवर तसेच खरेदी करणाऱ्यांवर कारवाईचा करण्यात येणार आहे . लवकरच कारवाईला सुरुवात करण्यात येईल . - डॉ. विक्रम आमटे, (पोलिस उपायुक्त - डीसीपी कायदा व सुव्यवस्था - DCP Law & Order Belgaum)
याप्रकरणी माळमारूती पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


जर तुम्ही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग करत असाल, तर पतंगाला ढील देण्याआधी सावध व्हा. अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. वारंवार आवाहन करूनही नायलॉन मांज्याचा उपयोग होत असल्याने, बेळगाव पोलिसांनी विक्रेत्यांबरोबरच पतंग उडविणाऱ्यावरही कारवाईचा इशारा दिला आहे. दरवर्षी नायलॉन मांजाचा विषय चर्चेत येतो. प्रशासनाकडून देखील दिखाव्या पुरतीच कारवाई होत असल्याने पक्षी आणि दुचाकी स्वारांचे जखमी होण्याच प्रमाण वाढल्याने बेळगाव शहरात नायलॉन मांजामुळे जखमी झालेत कुणाची मान कापली गेलीय तर कुणाला चेहऱ्यावर इजा झालीय. पक्षांचे तर जीवच जातायेत. एवढ्या घटना घडत असताना पोलीस करतायेत काय.  नायलॉन मांजाला बंदी असून देखील शहरात मांजा कसा दाखल होतो.
बंदी असलेला मांजा विर्की करण्याची हिम्मत विक्रेत्यांची कशी होते असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने पोलिसांनी आता थेट नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इषार दिलाय. जर  मुलगा अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार आहे.
यंदा चायना मांजा पतंगांच्या बाजारात धूम करीत आहे. इतर मांजापेक्षा स्वस्त असल्यामुळे त्याला मागणी असली तरी हा मांजा अनेकांच्या जीवावर उठला आहे. मजबूत व धारधार मांजाची मागणी युवकांकडून आहे. तुटून खाली पडला किंवा कशात अडकलेला मांजा मानवी शरिराच्या संपर्कात येवून अडकला तर मोठी जखमी करीत आहे. त्वचेत अडकल्यावर त्वचा फाडल्याशिवाय तो निघत नाही. अनेकवेळा त्याला त्वचेतून कापून बाहेर काढावे लागते. नॉयलॉन मिश्रीत हा दोरा असून त्याचा मजबूतपणा आणि टिकाऊपणा यामुळे तो तरुणांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय स्वस्त देखील आहेच.
350 ते 500 रुपयांना 5000 ते 6000 रुपये वार या प्रमाणे तो बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय आकाशात उडणाऱ्या पक्षांना देखील हा मांजा जायबंदी करीत आहे. चायना मांजावर बंदी घालावी अशी मागणी दरवर्षी करण्यात येते परंतू प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. यंदा देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना आणि पक्ष्यांना जीवघेणा ठरणारा या मांजाची विक्री स्वत: विक्रेत्यांनीच बंद करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन मधील मांजाचा वापर वाढला आहे. नायलॉनचा हा मांजा स्वस्त असून टिकावू स्वरुपाचा आहे. मांजा हाताने सहजासहजी तुटत नाही. पतंग उडविताना ब-याचदा हा मांजा झाडे व इमारतीमध्ये अडकला जातो. त्यातून वाऱ्याबरोबर हा मांजा रस्त्यावर आल्यास वाहन चालकांच्या गळ्याला अडकून जीवितास धोका होऊ शकतो.
पतंग उडविण्यावरून दोन गटात झाली वादावादी
शनिवारी सायंकाळी पतंग उडविण्यावरून वादावादीची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी रात्री वादावादीचे पर्यवसान रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास हाणामारीत झाले. दगडफेकीमुळे कामत गल्ली व माळी गल्ली परिसरात तणाव निर्माण झाला झाला होता. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मारहाणीत दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
रात्री त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची माहिती मिळाली आहे. माञ अशी कोणतीच घटना घडलेले नाही, असे सांगत एकंदर प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पोलीस अधिकायांनी केला आहे. शांतनेने नांदत असलेल्या बेळगावात धार्मिक व जातीय तणावामुळे शांतता बिघडू नये यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : पतंग उडवितांना मांजाचा दोरा लागून युवक जखमी
तर दुसरीकडे पतंग उडविण्यावरून वादामुळे त्या गल्लीत दगडफेक;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm