बेळगाव : अँबुलन्स व दुचाकी अपघात; कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीसह तिघांचा मृत्यू;

बेळगाव : अँबुलन्स व दुचाकी अपघात;
कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीसह तिघांचा मृत्यू;

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनाबाधिताला रुग्णालयात आणताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकही ठार

बेळगाव : अथनी तालुक्यातील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार घेत असलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविताना रुग्णवाहिकेचा (Ambulance) टायर फुटुन दुचाकी व रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यातील (जिल्हा सांगली) 51 वर्षीय कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीला BIMS रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणण्यात येत होते. रुग्णवाहिकेला शुक्रवारी 1.30 च्या सुमारास हुक्केरीजवळ अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंञण सुटल्याने समोरच्या दुचाकीला रुग्णवाहिकेची धडक बसून दुचाकीवर पाठीमागे बसलेला रबकवी (जि. बागलकोट) येथील एक युवक जागीच ठार झाला. हुक्केरी पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
अथनीतील रुग्णालयात उपचार घेणार्या मुचंडी (ता. जत) येथील एका 51 वर्षीय कोरोनाबाधिताची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. बेल्लद बागेवाडीहून हुक्केरीला येताना रुग्णवाहिकेचा टायर फुटून दुचाकीला धडक बसली. मोटारसायकलच्या पाठिमागे बसलेल्या सागर मल्लाप्पा दोडवाड (वय 19, रा. रबकवी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. झालेल्या अपघातानंतर कोरोनाबाधिताचाही काही वेळातच मृत्यू झाला. दुसर्या रुग्णवाहिकेतून कोरोनाबाधित व्यक्तीला बेळगावला हलविताना वाटेतच राष्र्टीय महामार्गावर कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
तर दुचाकी चालविणारा गोपाल आण्णाप्पा मुलीमनी (वय 18, रा. रबकवी) हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर हुक्केरी सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. आज शनिवारी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर हुक्केरीचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. हुक्केरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अँबुलन्स व दुचाकी अपघात; कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीसह तिघांचा मृत्यू;
कोरोनाबाधिताला रुग्णालयात आणताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकही ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm