बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नोव्हेंबरला Belgaum DCC Bank Election

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नोव्हेंबरला Belgaum DCC Bank Election

belgavkar.com | belgaum | belgavkar

आमदारांचे बंधुदेखील डीसीसी बँकेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची (District Co-operative Central Bank - DCC - डीसीसी) निवडणूक कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक आता 7-नोव्हेंबर-2020 ला होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. जिल्ह्याच्या राजकरणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक यापूर्वी जाहीर करण्यात आल्याने मोर्चे बांधणी सुरु होती. तसेच अनेकांनी मटणाच्या पार्ट्याही दिल्या होत्या. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेची 7 ऑगस्ट रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली. आतापर्यंत या बँकेची निवडणूक तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा इच्छूक मोर्चेबांधणीला लागले आहेत. सर्व तालुक्यात मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची उत्सकता आहे. त्याचबरोबर पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार काडाच्या उपप्रशासकीय अधिकारी जयश्री शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
माजी खासदार रमेश कत्ती (डीसीसी बँक अध्यक्ष) पुन्हा एकदा बँकेचा ताबा घेण्यासाठी आणि पुन्हा अध्यक्ष होण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांना त्यांचे बंधु उमेश कत्ती, जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी आणि माजी मंत्री व केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार शांता गौडर आणि माजी आमदार अरविंद पाटील हे त्यांच्या गटात वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर डीसीसी बँक निवडणुकीत भाजप नेत्यांच्या दोन गटात जोरदार स्पर्धा होणार आहे. या निवडणुकीचा राज्य सरकारवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच आरएसएस नेत्यांनी दोन्ही गटांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. परंतु सद्य परिस्थितीत अशी शक्यता फारच कमी आहे. दरम्यान, बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे भाऊ चन्नराज हत्तीहोळी हेदेखील डीसीसी बँकेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. बेळगाव तालुक्यातील बहुतेक सहकारी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभे आहेत. जिल्ह्यात निवडणुकीची तयारी आधीच सुरू आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण हादरवून टाकले जाणार यात आश्चर्य नाही.
कोरोना व्हायरस व लॉकडाऊनमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सहकार खात्याकडून निवडणूक निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी म्हणून बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांची नियुक्ती झाली आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार केली जात आहे. यासाठी डीसीसी बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहकारी संघांना माहिती पुरविण्याचे आवाहन बँकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. डीसीसी बँकेची निवडणूक 27 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित केले होते. निवडणूक अधिकारी म्हणून सईदा यांनी कच्ची मतदार यादी तयार करण्यासंबंधीचे पत्रक प्रसिद्धीस दिले होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नोव्हेंबरला Belgaum DCC Bank Election
आमदारांचे बंधुदेखील डीसीसी बँकेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm