बेळगाव : ग्राम पंचायतीची निवडणूक - आयोगाची तयारी सुरू; जिल्ह्यामध्ये एकूण 506 ग्राम पंचायत

बेळगाव : ग्राम पंचायतीची निवडणूक - आयोगाची तयारी सुरू;
जिल्ह्यामध्ये एकूण 506 ग्राम पंचायत

belgavkar.com | belgaum | belgavkar

निवडणुकीमध्ये 3.66 लाख युवा मतदार

कोरोना महामारीमुळे ग्राम पंचायत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आता या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असला तरी सुरक्षित अंतर ठेवून या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे. ग्राम पंचायतीची निवडणूक घेण्यासाठी पुढाकार घेतलेल्या निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणुकीबरोबरच त्यांच्या प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पाठविल्या आहेत. एकूण 6,025 ग्रामपंचायतीपैकी 5,800 पंचायतींनी जूनमध्ये मुदत पूर्ण केली आहे. त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी व इतर तयारी आयोगाने पूर्ण केली आहे. यापूर्वी ऑक्टोबरच्या अखेरीस निवडणुका घेण्याची अपेक्षा होती. आता मात्र डिसेंबरअखेर निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. मेअखेर संपलेल्या पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. कर्नाटक पंचायत राज नियम 1993 च्या नियम 6 नुसार जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक प्राधिकारच्या अधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी व साहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्याध्यापक / अधीक्षक / व्यवस्थापकीय अधिकारी आदी ब वर्ग अधिकाऱ्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहेत. जर अपुरे कर्मचारी उपलब्ध असतील तर, अनुभव आणि सेवा कौशल्य असलेल्या अधिकाऱ्याची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यास सांगितले आहे. त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीव्यतिरिक्त इतर ग्रामपंचायतीवर नियुक्ती करण्याची खबरदारी घेण्याचे निर्देशही आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 25 ते 35 सदस्य असलेल्या ग्राम पंचायतीवर एक निवडणूक अधिकारी आणि दोन साहाय्यकांची नेमणूक करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोणत्या क्षेत्रावर नेमले आहे, ते निर्दिष्ट केले पाहिजे असे नोटिशीत नमूद केले आहे. या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, 35 हून अधिक जागा असणार्या पंचायतींवर दोन निवडणूक अधिकारी नियुक्त करावे. निवडणुकीच्या आकडेवारीची गणना करण्यासाठी एनआयसीने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. तालुका स्तरावरील निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकारी निश्चित करून तपशील सॉफ्टवेअरमध्ये नोंद केले पाहिजे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सावधगिरीच्या उपाययोजना बाळगून प्रशिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान बेळगाव जिल्ह्यात 2020 च्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये 3.66 लाख युवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकीकडे संबंधित अधिकाऱ्यांना ग्राम पंचायतीच्या यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून याबाबत आता अधिकारी कामालाही लागले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 506 ग्राम पंचायती आहेत. त्यामधील 484 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर उर्वरित ग्राम पंचायतींच्या निवडणुका काही कालावधीनंतर होतील. बेळगाव जिल्ह्यात एकूण 25.70 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 13.7 लाख पुरुष व 12.62 लाख महिला आहेत. बेळगाव जिल्ह्यात 2015 साली 22.4 लाख मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 11.32 पुरुष व 10.71 महिला मतदारांनी मतदान केले होते. यावेळी यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून 3.66 लाख युवा मतदार आहेत.
तालुक्यांची नावे 2020 मधील मतदार संख्या
बेळगाव 354385
खानापूर 19257
हुक्केरी 261227
बैलहोंगल 15880
कित्तूर 70436
रामदुर्ग 158673
सौंदत्ती 203983
गोकाक 209320
मुडलगी 100636
चिकोडी 212879
निपाणी 153488
रायबाग 190886
अथणी 230478
कागवाड 73011
एकूण 2570790

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ग्राम पंचायतीची निवडणूक - आयोगाची तयारी सुरू; जिल्ह्यामध्ये एकूण 506 ग्राम पंचायत
निवडणुकीमध्ये 3.66 लाख युवा मतदार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm