मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट; मंत्रिमंडळ विस्तार आणि नेतृत्वबदलाच्या चर्चेनंतर दिल्लीत

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट;
मंत्रिमंडळ विस्तार आणि नेतृत्वबदलाच्या चर्चेनंतर दिल्लीत

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत गुरुवारी दिल्लीला पोहोचले. मुख्यमंत्री येडियुरप्पा दोन दिवसांच्या दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्र्यांसमवेत राज्य मुद्द्यांविषयी चर्चा करणार आहेत. येडियुरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले की, 'मी दिल्लीत अनेक केंद्रीय मंत्र्यांसमवेत राज्याच्या विकासकामांवर चर्चा करण्यासाठी आलो आहे. त्याचबरोबर मी पक्षाच्या नेत्यांसमवेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा करेन आणि त्यांची मते जाणून घेईन.'
मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांचा मुलगा आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बी. वाय. येडियुरप्पा दिल्लीत आहेत. सत्तेतील नाराज आमदार कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा दबाव आणत आहेत, तरीसुद्धा येडियुरप्पा असे बदल करण्यास उत्सुक नाहीत. भाजपमध्ये सुरु असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा गुरुवारी नवी दिल्ली येथे पोहोचल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विवीध विकासकामांसंदर्भात चर्चा केली. येडियुरापा त्यांनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटक शिवमोगा येथे संरक्षण संशोधन विकास संघटनेची (DRDO डीआरडीओ) स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याची विनंती केली.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नोटबंदीमुळे झालेल्या विघातामुळे कर्नाटकसाठी 5495 कोटींच्या विशेष अनुदानासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारश मान्य करण्याची विनंती केली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, उपमुख्यमंत्री गोविंद एम. करजोल, राजकिय सचिव शंकरगौडा पाटील, मुख्य सचिव टी. एम.विजय भास्कर उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट; मंत्रिमंडळ विस्तार आणि नेतृत्वबदलाच्या चर्चेनंतर दिल्लीत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm