“मला क्रिकेटर व्हायचचं नव्हतं…”, का केलं हे धक्कादायक विधान?

“मला क्रिकेटर व्हायचचं नव्हतं…”, का केलं हे धक्कादायक विधान?

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. तो म्हणाला की, “त्याला क्रिकेटर व्हायचं नव्हतं.” गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याच्या कारकिर्दीत भारताचा महत्त्वाचा भाग होता आणि अजूनही आहे. त्याने अनेक वेळा संघासाठी महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. गंभीरने 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतासाठी मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. गंभीरची खेळी क्रिकेट चाहते कधीच विसणार नाही. नेमकं असं काय झालं? ज्यामुळे तो असे विधान करत आहे, जाणून घेऊ या.
माजी क्रिकेटपटू असण्याबरोबरच तो एक गोतम गंभीर खासदार (दिल्ली) देखील आहे. गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. तो अनेकदा इतर खेळाडूंबद्दल प्रतिक्रिया देत असतो. त्याचवेळी, गंभीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो की, “मला क्रिकेटर क्रिकेटर व्हायचचं नव्हतं.” क्रिकेटर नसता तर काय झाला असता याबद्दल भाष्य केलं आहे.
‘बडा भारत टॉक शो’मध्ये गोतम गंभीरला विचारण्यात आले होते की, “तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु : ख काय आहे?” यावर माजी सलामीवीर गंभीरने आश्चर्यकारक असे उत्तर दिले. तो म्हणाला, “मी क्रिकेटर व्हायला नको होते. मला कधीच क्रिकेटर व्हायचं नव्हतं.” मात्र, गंभीरने असे वक्तव्य का केले याचा खुलासा केलेला नाही.
अशी आहे गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द
गौतम गंभीर 2003 ते 2016 या काळात भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या 104 डावांमध्ये त्याने 41.95च्या सरासरीने 4154 धावा केल्या ज्यात 9 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 143 डावांमध्ये त्याने 39.68च्या सरासरीने 5238 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 11 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली.
आंतरराष्ट्रीय टी20च्या 36 डावांमध्ये त्याने 27.41च्या सरासरीने आणि 119.02च्या स्ट्राईक रेटने 932 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 7 अर्धशतके केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त गंभीरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 154 सामने खेळले. आयपीएलच्या 152 डावांमध्ये त्याने 31.01च्या सरासरीने आणि 123.91च्या स्ट्राइक रेटने 4218 धावा ठोकल्या, ज्यामध्ये त्याने एकूण 36 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपदही भूषवले आणि संघाला दोनदा विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली.

Shouldnt Have Become A Cricketer : Gautam Gambhir On His Biggest Regret In Life

Mai Cricketer Nahi Hona Chahiye Tha : Gautam Gambhir On His Biggest Regret In Life

“मला क्रिकेटर व्हायचचं नव्हतं…”, का केलं हे धक्कादायक विधान?
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm