...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कोटा येथे प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता Video

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कोटा येथे प्रवासी असलेली बोट उलटली;
7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात सुमारे चार डझनपेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली बोट चंबळ नदीत उलटल्याने मोठा अपघात झाला. या बोटीत जवळपास 45 प्रवाशांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बुडालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्याच्या सीमालगत भागात असलेल्या गोठडा कला गावाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी (16 सप्टेंबर) सकाळी साधारण 9 च्या सुमारास ही बोट उलटल्याची माहिती मिळत आहे.
बोटीमध्ये महिला, पुरुष, लहान मुलांसह वृद्धांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. बोटीत असलेल्या प्रवाशांची तसेच बुडालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बोट कशी उलटली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

चंबळ नदीत बोट उलटली असून बोटीमध्ये जवळपास 25 ते 40 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बोट उलटल्याचं दिसताच तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी बुडालेल्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला देण्यात आली.
पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काहींचा जीव वाचवण्यात यश आले आहे. वेगाने बचावकार्य सुरू : बोट उलटतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नदीकिनारी बचावकार्य सुरू आहे. गोठडा गावातून चंबळ नदी ओलांडत असताना अचानक बोट एका बाजूने उलटली आणि दुर्घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत असून त्यांचा शोध सुरू आहे. तर 10 अधिक लोकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कोटा येथे प्रवासी असलेली बोट उलटली; 7 जणांचा मृत्यू, 14 बेपत्ता Video

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm