बेळगाव : पाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा  खड्यात पडून मृत्यू

बेळगाव : पाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा खड्यात पडून मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भोपळ्याची पाने तोडण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा परसातील शेणाच्या खड्यात पडून मृत्यू झाला. सोमवारी (ता. 14 सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास मण्णूर (ता. बेळगाव) येथे ही घटना उघडकीस आली. यल्लुबाई भावकू काकतकर (वय 70, रा. मण्णूर ) असे मृत वृद्धेचे नाव आहे. घटनेची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी लक्ष्मण भावकू काकतकर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काकतकर कुटुंब मण्णूरला वास्तव्यास आहेत. घरात लक्ष्मणची आई यल्लुबाई राहत होत्या. लक्ष्मण हे फॅब्रिकेशनचे काम करतो. तो सुळगा येथे कामावर गेले होता. दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मण जेवणासाठी घरी परतला त्यावेळी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने परसात जाऊन पाहणी केली असता शेजारी अशोक चौगुले यांच्या शेणाच्या खड्यात केसरी रंगाची साडी पडल्याचे त्यांना दिसून आले. जवळ जाऊन पाहणी केली असता, आई यल्लुबाई पडल्याचे निदर्शनास आले. खड्ड्यात पाणी साचले असल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कोणावरही संशय नसल्याची फिर्याद लक्ष्मण यांनी काकती पोलिसांत दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : पाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा खड्यात पडून मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm