बेळगाव : हरणाने धावत्या दुचाकीवर उडी घातल्याने दुचाकीस्वार युवक जखमी

बेळगाव : हरणाने धावत्या दुचाकीवर उडी घातल्याने दुचाकीस्वार युवक जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : धावत्या दुचाकीवर हरणाने अचानक झडप घातल्याने झालेल्या अपघातात तरूण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 15 सप्टेंबर) खानापूर तालुक्यातील गंगवाळी येथे घडली. रस्ता ओलांडताना हरणाची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जखमी झाला. हरणामुळे अपघात घडल्याची ही पहिलीच घटना असावी. चेतन बबन निलजकर (वय 27) असे या जखमी दुचाकीस्वार युवकाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या हाताला व पायाला गंभीर जखम झाली आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चेतन हा काम अटोपून गावी जात असताना अचानक जंगलातून आलेले हरीण रस्ता ओलांडताना त्याच्या दुचाकीला धडकले. त्यात दुचाकी घसरून पडल्याने चेतन जखमी झाला. हे हरण रस्ता ओलांडतांना दुचाकीला जोरात आदळल्यामुळे चेतनचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर आपटला. खानापूर प्राथमिक उपचारानंतर त्याला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे राजेंद्र रायका यांनी रुग्णालयात युवकाची भेट घेतली व त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य घेतले. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून त्यांच्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे .
गंगवाळी आडवळणी असून बसची सोय नाही त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागते. वन्यप्राणी बिनधास्त रस्त्यावर मुक्तसंचार करू लागल्याने प्रवाशांसह प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी योजना आखण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हरणाने धावत्या दुचाकीवर उडी घातल्याने दुचाकीस्वार युवक जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm