बेळगाव : कोण्णूर - गोकाक रोडवर अपघातात तरुण ठार

बेळगाव : कोण्णूर - गोकाक रोडवर अपघातात तरुण ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. गोकाक : गोकाक तालुक्यातील कोण्णूर - गोकाक रोडवर मंगळवारी दोन दुचाकींच्या अपघातात तरुण ठार झाला आहे. भरधाव दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक दिल्याने समोरील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कोण्णूर - गोकाक रोडवर मंगळवारी हा अपघात झाला. धडक देणारा दुचाकीस्वार वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला. जगदीश काडाप्पा तलवार (वय 36, रा. कोण्णूर, ता. गोकाक) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जगदीश तलवार दुचाकीवरून गोकाक रोडकडे जात असताना मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने जगदीश खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस फरारी दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कोण्णूर - गोकाक रोडवर अपघातात तरुण ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm