बेळगाव : 'श्रीराम सेना हिंदूस्थान'तर्फे गरजुंसाठी 22 ऑक्सिजन सिलिंडर

बेळगाव : 'श्रीराम सेना हिंदूस्थान'तर्फे गरजुंसाठी 22 ऑक्सिजन सिलिंडर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावमध्ये उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने....

बेळगाव : कोरोना बाधितांवर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडर नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. 'श्रीराम सेना हिंदूस्थान'च्यावतीने बेळगावमधील गरजुंसाठी 22 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे आज 15 सप्टेंबर रोजी गरजू कोरोना रूग्णांसाठी या सिलिंडरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक - अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर व ईतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.

गरजुंनी या क्रमांकाशी संपर्क साधावयाचा आहे.
शंकर पाटील - 9620829888
बळवंत शिंदोळकर- 9742421343
श्रीकांत कुर्याळकर - 8618691198
सचिन चव्हाण - 9606885088
विजय पाटील - 9632484587
विशाल कुर्टे - 7760331744
रोहित जांबळेाकर - 8951069698
प्रवीण - 9036416142, भरत पाटील - 8867331273, विकास चव्हाण - 831038243 राजु - 9036 505790 . संदिप चौगुले - 974 20 20482, प्रदीप - 8951469667
कोरोना महामारीत ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रूग्णांचा ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने मृत्यू होत आहे. हे विदारक चित्र पाहून सामाजिक संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळ ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून श्रीराम सेना समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.
बेळगावमध्ये उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचे वारंवार दिसून येत असल्याने संघटनेच्यावतीने बेळगावकरांसाठी हे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले. गरजू व्यक्तींना हे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी राखत नागरिकांना हे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरच्या नावाखाली काही ठिकाणी लुटालूट सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळावा यासाठीचा हा उपक्रम आहे.
या कार्यक्रमावेळी अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मार्केट पोलिस स्टेशनचे सीपीआय धीरज शिंदे, रणजीत चव्हाण-पाटील, रमेश पावले, शंकर पाटील, बळवंत शिंदोळकर, श्रीकांत कुर्याळकर, भरत पाटील, विकास चव्हाण यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'श्रीराम सेना हिंदूस्थान'तर्फे गरजुंसाठी 22 ऑक्सिजन सिलिंडर
बेळगावमध्ये उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm