बेळगाव : 5 जणांवर गुन्हा दाखल

बेळगाव : 5 जणांवर गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

व्यवसायिक युवकाची आत्महत्या

बेळगाव-निपाणी : येथील दलाल पेठेतील व्यवसायाच्या ठिकाणी केशव किरण शिंदे (वय 24, रा. जत्राटवेस) या युवकाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्याचे वडील किरण शिंदे यांनी 5 जणांविरोधात शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार केशवच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अश्विनी प्रभाकर कदम, लक्ष्मी प्रभाकर कदम, प्रभाकर पुंडलिक कदम, गिरीश प्रभाकर कदम व नयनप्रभाकर कदम (सर्वजण, रा. जत्राट वेस) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत केशव याचा अश्विनीसोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, सध्या दोघेही आपल्या आई-वडिलांकडे स्वतंत्र राहत होते. दरम्यान, अश्विनीने गतवर्षी बसवेश्वर चौक पोलिस स्थानकात केशवच्याविरोधात फिर्याद दिली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. मधल्या काळात केशवला वरील पाचजणांकडून त्रास होत होता. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.
या त्रासाला कंटाळून आपला मुलगा केशवने आत्महत्या केल्याचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उमादेवी तपास करत आहेत. केशव आपल्या वडिलांसोबत हातमोजे विक्रीचा व्यवसाय करत होता. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याने दलाल पेठ येथे भाडोत्री खोली घेऊन गणेश मूर्तीसह राखी विक्रीही सुरू केली होती. दुपारी केशवचे वडील किरण हे दुपारी घरी जेवायला गेले असताना केशवने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

belgaum Complaint against 5 people in nipani city police station belgavkar बेळगाव belgaum

belgaum nipani city police station belgaum

बेळगाव : 5 जणांवर गुन्हा दाखल
व्यवसायिक युवकाची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm