बेळगाव : ट्रकच्या धडकेत सायकलिंग करणार्या युवकाचा मृत्यू

बेळगाव : ट्रकच्या धडकेत सायकलिंग करणार्या युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सकाळच्यावेळी सायकलिंग करणार्या युवकाला सिलिंडर वाहतूक करणार्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी केस्ती (ता. हुक्केरी) येथे घडली. गणेश महादेव डंग (वय 18, रा. केस्ती) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत संकेश्वर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश हा दररोज सायकलिंगसाठी जात असे.
शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास तो बाडहून केस्तीकडे येत असताना, केस्तीहून कणगलाकडे जाणार्या सिलिंडर वाहतूक करणार्या ट्रकने गणेशला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक सुभाष शिवलिंग पाटोळे याला ट्रकसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास चालविला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ट्रकच्या धडकेत सायकलिंग करणार्या युवकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm