तुम्ही केव्हा चमकणारी अळंबी पाहिलीत का?

तुम्ही केव्हा चमकणारी अळंबी पाहिलीत का?

belgavkar.com | belgaum | belgavkar

आढळली रात्री चमकणारी अळंबी, महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

या गावात चमकणारी अळंबी आढळली

तुम्ही केव्हा चमकणारी अळंबी पाहिलीत का? नाही ना... मग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चमकणारी अळंबी, तीही कोकणात. महाराष्ट्रातील पहिलीच चमकणारी अळंबीची नोंद जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले (वेंगुर्ला) तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे.
या अगोदर चमकणारी अळंबी केरळ राज्यात आढळली होती, त्यानंतर दुसरी नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अगोदर चमकणारी बुरशी आढळली होती तीही तिलारी खोऱ्यात. मात्र आता चमकणारी अळंबी आढळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांच्या परसबागेत दुर्मिळ 'बायोलुमिनिकन्स फंगी' म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा दुर्मिळ अळंबीची नोंद झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेने समृद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

sindhudurg bioluminescent mushroom glows in the forests of konkan alambi vengurla

bioluminescent mushroom glows in the forests of konkan alambi

तुम्ही केव्हा चमकणारी अळंबी पाहिलीत का?
आढळली रात्री चमकणारी अळंबी, महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm