बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित ओगलेंचा झाला भाजपामध्ये प्रवेश

बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित ओगलेंचा झाला भाजपामध्ये प्रवेश

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित प्रतिक प्रकाश ओगले यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. ओगले यांनी आज सोमवारी सायंकाळी 4 वाजता शुभम गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंञी व कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. राजकीय प्रवेशाच्या अगोदर ओगले यांनी रविवारी श्री रमाकांत कोंडुसकर (राष्ट्रीय अध्यक्ष, श्री रामसेना, हिंदुस्थान) यांच्याकडे श्री राम सेना हिंदुस्थान खानापूर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. गेली 12 अनेक वर्षे ओगले श्रीराम सेना व श्रीराम सेना हिंदुस्थान या हिंदू संघटनेत होते. ते खानापूर तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत होते.

भाजपा प्रवेशावेळी खासदार अनंतकुमार हेगडे, बेळगाव जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, भाजपा नेते विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याआधी सकाळी खानापूर तालुक्यातील होणार्या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. विविध गावात पंतप्रधान ग्रामसडक योजनाचे भूमिपूजन खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले. माञ उदघाटनासाठी खानापूरचे आमदार डाँ. अंजली निंबाळकर यांना आमंत्रित करण्यात आले नाही, असा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. आमदार अंजली निंबाळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नियमावलीनुसार आमदार होम क्वारंटाईन असल्याने त्यांना कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्यामुळेच हा कार्यक्रम होत आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. आमदार अंजली निंबाळकर यांना भूमीपूजनासाठी आमंत्रित करण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित ओगलेंचा झाला भाजपामध्ये प्रवेश

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm