बेळगाव : यांना कोणीतरी आवर घाला; 'सेल्फी'च्या नादात जीवाला मुकणार ही पोरं - गोकाक फाॅल्स

बेळगाव : यांना कोणीतरी आवर घाला;
'सेल्फी'च्या नादात जीवाला मुकणार ही पोरं - गोकाक फाॅल्स

belgavkar.com | belgaum | belgavkar

गोकाक फॉल्स Gokak Falls

बेळगाव : मुसळधार पावसामुळे गोकाक येथील धबधबा व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. गोकाक तालुक्यातील घटप्रभा नदीवरील धबधबा (गोकाक फॉल्‍स) अलीकडे कमालीचे लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. तरुणाईबरोबरच आबालवृद्धांना या धबधब्यासह येथील वातावरणाची भुरळ पडली आहे. पावसाळ्यात येथे अक्षरश : जत्रा भरते. येथील मंत्रमुग्ध करणारे नैसर्गिक वातावरण लोकांना खेचून आणत आहे. या जबरदस्त ‘लोकेशन्स’वर फोटो न काढले तरच नवल. धबधब्याच्या कड्याजवळ आणि टोकावर धोकादायक स्थितीत सेल्फी व फोटोसेशन केले जात आहे. मात्र, असे करणे जिवावर बेतू शकते, याची कसलीही फिकीर तरुणाईला नाही. रविवारी गोकाक फॉल्सवर धबधबा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.
पावसाळ्यात येथील वातावरण अत्यंत मनमोहक असते. हा नयनरम्य परिसर व नजारे डोळ्याने पाहून मनात साठवण्यासाठी व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपड सुरू असते. मात्र, सेल्फी व फोटो काढण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर कोणाचाच अंकुश नसल्याने एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी, हिडकल डॅम किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी सेल्फीचा मोह अनेकांना होतोच. या मोहापायी काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना सोडू नये, त्यांनी तेथे पोहोचू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
वाऱ्याचा वेग जोरात असल्यास अजूनही पाणी जोराने फेकले जात आहे. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. शनिवारी व रविवारी विशेष गर्दी दिसून येते. अशा वेळी खाली उतरून फोटो व सेल्फी काढले जात आहेत. यात प्रचंड धोका आहे. वाऱ्याचा झोत मोठा आल्यास जिवावर बेतू शकते. मात्र, त्याची फिकीर कोणासही नसते. यावर कोण अन्‌ कसा अंकुश ठेवणार, हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाने अटकाव करूनही लोक स्वतःहून जीव धोक्यात घालत आहेत. यांना आवर घालणे जरुरीचे आहे, अन्यथा इतर स्थळांप्रमाणे या स्थळालादेखील गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

belgaum crowd of youths to see the waterfall of gokak falls belgaum gokak falls

waterfall of gokak falls belgaum gokak falls tourist crowd

बेळगाव : यांना कोणीतरी आवर घाला; 'सेल्फी'च्या नादात जीवाला मुकणार ही पोरं - गोकाक फाॅल्स
गोकाक फॉल्स Gokak Falls

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm