बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित ओगलेंचा भाजपामध्ये प्रवेश; संघटनेचा राजीनामा

बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित ओगलेंचा भाजपामध्ये प्रवेश;
संघटनेचा राजीनामा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : श्री रमाकांत कोंडुसकर (राष्ट्रीय अध्यक्ष, श्री रामसेना, हिंदुस्थान) यांच्याकडे श्री राम सेना हिंदुस्थान खानापूर तालुका अध्यक्ष पंडित प्रतिक प्रकाश ओगले यांनी संघटनेच्या खानापूर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गेली अनेक वर्षे ओगले श्रीराम सेना व श्रीराम सेना हिंदुस्थान या हिंदू संघटनेत होते. ते खानापूर तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत होते.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते ओगले यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ओगले सोमवारी माजी केंद्रीय मंञी व कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे व राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याने त्यांनी श्री रामसेना हिंदुस्थान संघटनेच्या खानापूर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आज ओगले यांनी औपचारिकपणे ही घोषणा केली.


भाजपात प्रवेश करण्याआधी ओगले यांनी श्री रमाकांत कोंडूसकर यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. रमाकांत कोंडूसकर यांनी ओगले यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. खानापूर तालुक्यात ओगले यांनी हिंदुत्वासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते याची कायम जाणीव ठेवतील. ओगले यांना देव, देश, धर्म कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हिंदुत्ववादी पंडित ओगलेंचा भाजपामध्ये प्रवेश; संघटनेचा राजीनामा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm