MES.jpg | समिती तर्फे टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा... | belgaum news | belgavkar बेळगावकर
28112018_MESMahamelavaNivedan.jpg | समिती तर्फे टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा... | belgaum news | belgavkar बेळगावकर

समिती तर्फे टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा...

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह 865 मराठीबहुल गावे 1956 साली कर्नाटकात डांबण्यात आली आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे व लोकशाही मार्गाने लढा चालू असताना देखील बेळगावात सुवर्णसौध उभी करून मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारकडून येथे हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती तर्फे 10 डिसेंबरला टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा

त्यामुले घटनेने दिलेल्या अधिकारानुसार या महामेळाव्याला परवानगी द्यावी, अशी मागणी म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेतेमंडळीही उपस्थित राहणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
बेळगाव पोलिस आयुक्तांनाही निवेदन

या महामेळाव्याची माहिती बेळगाव पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनासुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आली. महामेळाव्याला अजून वेळ आहे त्यामुळे परवानगी द्यायची काय नाही यावर योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
यावेळी दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार अरविंद पाटील, अ‍ॅड रमेश पाटील, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, राजू मरवे, रणजीत चव्हाण-पाटील, विलास कलगटगी, पी. एच. पाटील, प्रकाश पाटील, आर. के. पाटील, यांच्यासह म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिवेशन काळात इतर संघटना जसे आंदोलन करतात तसेच इतर मराठी भाषिक महामेळावा : आमदार सतीश जारकीहोळी

काही कन्नड पत्रकारांनी समितीच्या महामेळाव्याबाबत आमदार सतीश जारकीहोळी यांना विचारले असता, सीमाप्रश्न हा मराठी भाषिकांचा प्रश्‍न आहे, त्याला विरोध न करता आमचा विकासावर भर राहील. त्यामुळे इतके महत्त्व देण्याची काही गरज नाही अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली.