बेळगाव : शंकरगौडा पाटील यांना कॅबिनेट दर्जाचे पद

बेळगाव : शंकरगौडा पाटील यांना कॅबिनेट दर्जाचे पद

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटकाचे मुख्यमंञी बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिवपद भूषविणारे बेळगाव भाजपचे जेष्ठ नेते शंकर गौडा पाटील यांना विशेष दर्जाचे मंत्री पद मिळाले आहे. आता ते केंद्र सरकारसाठी राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नवी दिल्ली येथे काम पाहणार आहेत. हे पद कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद आहे. पाटील हे राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी बनले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या राजकिय सचिव पदा सोबत त्यांना ही बंपर लॉटरी लागली आहे.
बेळगावमध्ये भाजपसाठी त्यांनी सुरुवातीपासून योगदान दिले आहे. या अगोदर त्यांनी बुडा अध्यक्ष, कर्नाटक वन विकास औद्योगिक निगम महामंडळ अध्यक्ष, विद्यमान मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव अशी मोठी पदे मिळवली होती. ते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे जवळीक मानले जातात. येडियुरप्पा यांची भाजपा सोडल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक जनता पक्षातुन त्यांनी बेळगावमध्ये आमदारकीची निवडणुकही लढविली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शंकरगौडा पाटील यांना कॅबिनेट दर्जाचे पद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm