VIDEO : लोकसभेला कर्नाटकात जेडीएस भाजपाबरोबर युती करणार? कुमारस्वामी म्हणाले, “आमचा पक्ष…”

VIDEO : लोकसभेला कर्नाटकात जेडीएस भाजपाबरोबर युती करणार?
कुमारस्वामी म्हणाले, “आमचा पक्ष…”

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जागा घटल्या

कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय संपादीत केला. तर, भाजपा आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना पराभवाचा सामना करावा लागला. कर्नाटकात काँग्रेसला 135 जागा, भाजपाला 66 आणि जेडीएसला 19 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं आहे. ते ‘एएनआय’शी बोलत होते. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जेडीएस भाजपाबरोबर युती करणार का? यावर कुमारस्वामी यांनी सांगितलं की, “आमची प्राथमिकता आमचा पक्ष स्वत : च्या ताकदीवर पुढे नेण्यावर आहे. पुढे काय होते पाहूया…” “राष्ट्रीय पक्षांना वाटत असेल जेडीएस संपली आहे. पण, आम्ही आमचा पक्ष मजबूत करू. काँग्रेसच्या कामगिरीबद्दल मला माहिती आहे. ते कोणत्या पद्धतीने सरकार चालवणार आहे, याचीही मला कल्पना आहे,” असं कुमारस्वामींनी सांगितलं.
“कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही 19 जागा जिंकल्या. राष्ट्रीय पक्षांना वाटत असेल की जेडीएला त्यांनी संपवलं आहे. मात्र, ते स्वप्न पाहत आहेत. काँग्रेसच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. भाजपाचे जे केलं तेच काँग्रेस करत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत काँग्रेसचं सत्य समोर येईल,” असेही कुमारस्वामी म्हणाले.

Kumaraswamy On Jds Alliance With Bjp In Karnataka Loksabha 2024 Election

will jds go with bjp in lok sabha 2024 elections what hd kumaraswamy reply

Karnataka Loksabha 2024 Election

VIDEO : लोकसभेला कर्नाटकात जेडीएस भाजपाबरोबर युती करणार? कुमारस्वामी म्हणाले, “आमचा पक्ष…”
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जागा घटल्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm