नितीन गडकरी धमकी प्रकरणी NIA कडून महत्वाचे पाऊल

नितीन गडकरी धमकी प्रकरणी NIA कडून महत्वाचे पाऊल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावच्या हिंडलगा कारागृहातूनच फोन;
100 कोटींची केली होती मागणी

धमकी प्रकरणाचा तपास एनआयएने

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरु केला आहे. यासाठी एनआयएचे पथक नागपूरला पोहचले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून 100 कोटींची खंडणी देखील मागण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी याला ताब्यात घेतलं आहे.
अधिकारी नागपुरात दाखल  : नितीन गडकरी धमकी प्रकरणात एनआयएचे अधिकारी नागपुरात दाखल झाले आहे. NIA चे दोन DIG स्तरावरील अधिकारी नागपुरात आले असून त्यांनी नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणी आरोपी जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला NIA ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बेळगावातून केली होती अटक
याप्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी याला बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून अटक केली होती. हिंडलगा कारागृहातूनच त्याने फोन केल्याचा पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत, त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. एनआयएने नितीन गडकरी यांना धमकावल्याबद्दल बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केला होता. आता जयेश पुजारी याचे लष्कर-ए-तैयबा आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची चौकशी एनआयए पथक करणार आहे.
14 जानेवारीला धमकीचा फोन केला : 14 जानेवारी रोजी पुजारीने गडकरींच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन केला, ज्यात 100 कोटी रुपयांची मागणी केली आणि दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला. त्यावेळी ते शेजारच्या कर्नाटक राज्यातील तुरुंगात होते. पोलिसांनी सांगितले की, त्याने 21 मार्च रोजी आणखी एक फोन केला आणि त्याने 100 कोटी रुपये न दिल्यास हत्या करण्याची धमकी दिली होती. बेळगाव जेलमधून आरोपी जयेश पुजारी याच्याकडून दोन मोबाईल, दोन सीम कार्ड जप्त केले होते.

Nitin gadkari threat nia team reaches in nagpur takent nagpur police meeting

Nitin gadkari threat nia team belgaum jail

नितीन गडकरी धमकी प्रकरणी NIA कडून महत्वाचे पाऊल
बेळगावच्या हिंडलगा कारागृहातूनच फोन; 100 कोटींची केली होती मागणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm