700 वर्षांपासून धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे गणपती बाप्पा विराजमान, ‘असा’ आहे रंजक इतिहास

belgavkar.com | belgaum | belgavkar

‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’, ‘आला रे आला गणपती आला’, ‘एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार’ असा जयघोष करत काल देशभरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. आराध्य दैवत असलेला गणपती बाप्पा फक्त हिंदुस्थानच नाही तर जगातील अनेक देशात पूजनीय आहे. अनेक देशात आजही उत्खननात गणपतीच्या मूर्ती आढळतात. इंडोनेशियामध्ये तर चलनी नोटेवर गणपती बाप्पाचे चित्र असते. विशेष म्हणजे याच देशातील एका सक्रिय ज्वालामुखीच्या तोंडावर गेल्या 700 वर्षांपासून गणपती बाप्पा विराजमान आहे.
इंडोनेशिया या देशात एकूण 141 ज्वालामुखी आहेत. यातील 130 अजूनही धगधगत असून अनेकद यात स्फोट होत असतो. यातील एक माउंट ब्रोमो (Mount Bromo) डोंगरावर सक्रिय आहे. जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखीमध्ये याचा समावेश होत असल्याने येथे जाण्यास मनाई आहे. मात्र तरीही 700 वर्षांपूर्वी या ज्वालामुखीच्या तोंडावर गणपती बाप्पाचे मंदिर उभारण्यापासून नागरिकांना कोणी रोखू शकले नाही.
माउंट ब्रोमो याचा स्थानिक जावानीज भाषेतील अर्थ ‘ब्रह्मा’ असा आहे. मात्र गेल्या 700 वर्षांपासून येथे गणपती बाप्पा विराजमान असून पूर्वजांनी हे मंदिर उभारले, असे स्थानिक लोक सांगतात. धगधगत्या ज्वालामुखीपासून गणपती बाप्पा रक्षण करत आला आहे, असे येथील नागरिक सांगतात. ज्वालामुखीच्या तोंडावर असणाऱ्या या गणपती मंदिराला Pura Luhur Poten या नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती असून या सर्व ज्वालामुखीतून निघालेल्या लाव्हा रसापासून बनवण्यात आल्या आहेत.


माउंट ब्रोमो डोंगराच्या जवळपास असणाऱ्या 30 गावात जवळपास 1 लाख लोक राहतात आणि हे सर्व लोक स्वतःला हिंदू मानतात आणि हिंदू रीतिरिवाज पाळतात. तसेच काळानुरूप येथे हिंदू आणि बौद्ध परंपरा यांचीही भेसळ झाली आहे. येथील लोक त्रिदेव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) यांची पूजा करतात आणि भगवान बुद्धाची देखील पूजा करतात. तसेच पूर्वेकडे स्थायिक असणाऱ्या Tenggerese जातीच्या समूहात पूर्वापार गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे.
Tenggerese जातीची लोक प्रत्येक वर्षी 14 दिवस माउंट ब्रोमो येथील गणपतीच्या मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करतात. या पूजेला Yadnya Kasada पर्व असे बोलले जाते. 13 व्या किंवा 14 व्या शतकात या पूजेला सुरुवात झाली असे येथील नागरिक सांगतात. यामागे देखील एक लोककथा सांगितली जाते. यानुसार देवाने येथील निःसंतान राजा-राणीला मुलबाळ होतील असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून येथील डोंगरावर पूजा-अर्चा सुरू झाली आणि ज्वालामुखीला पशु बळी देण्याची प्रथा सुरू झाली. आजही येथे बळी देण्यात येतो. यावेळी गणेशाची पूजा करून पशु बळी, फलाहार, फुल, भाजीपाला ज्वालामुखीला अर्पण केला जातो.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

700 वर्षांपासून धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे गणपती बाप्पा विराजमान, ‘असा’ आहे रंजक इतिहास

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm