WhatsApp Fake International Calls : जगभरातील कोट्यवधी युजर्सना एका क्लिकवरून संपर्कात ठेवणाऱ्या व्हॉट्सॲपवरून सध्या भलताच स्कॅम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हॉइस मिस कॉल येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक व्हॉट्सॲप युजर्सने याबाबती तक्रारी केल्या आहेत. संपूर्ण देशात ही समस्या वाढली असून याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून आता व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने याप्रकरणी खुलासा केला आहे.
व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, “आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेफ्टी टूल देत आहोत. व्हॉट्सॲपवर ब्लॉक-रिपोर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. या ॲपवरून होणाऱ्या अनैतिक कामांवर प्रतिबंध घालण्याचा आमचा कायम प्रयत्न असेल. परंतु, आता नवा स्कॅम आला आहे. यामध्ये एका क्रमाकांवर मिस कॉल दिला जातो. त्या नंबरवर लोकांना परत कॉल केला की त्यांच्यासोबत स्कॅम केला जातो. परंतु, या स्कॅमवर व्हॉट्सॲपने 50 टक्क्यांपर्यंत प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला आहे.”
काही दिवसांपूर्वी याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही मोठं विधान केलं होतं. फोनमध्य इनबिल्ट असलेल्या ॲप्सना काय काय ॲक्सेस करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबादारी संबंधित कंपन्यांनी घ्यायला हवी.
आपण अनेक वेगवेगळ्या स्कॅमबाबत (Scam) ऐकतो. जामताडा सीरिज तर आपल्यापैकी बऱ्याचजणांनी पाहिली असेलच. फोन करुन आपला ओटीपी घेत हे चोरटे आपल्या अकाउंटमधले सगळे पैसे एका क्षणात लंपास करतात. पण आता सध्या असाच एक नवा स्कॅम आला आहे. या स्कॅममार्फत नव्या पद्धतीनं लोकांना गंडा घातला जात आहे. काय आहे हा नवा फ्रॉड जाणून घेऊयात... जर तुम्हाला +84, +62, +60 आणि अशा इतर क्रमांकांनी सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असतील, तर असे कॉल घेऊ अजिबात रिसिव्ह करु नका. तसेच, हे नंबर एका क्षणाचीही वाट न पाहता ब्लॉक करा.
- कर्नाटक : ब्रेकअप, भेट अन् भांडण; माजी प्रेयसीचा जीव घेऊन वेगळाच बनाव रचण्याचा प्रयत्न; अपयश येताच...
- पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय...! WTC फायनलसाठी 2 खेळपट्ट्या;
- “दुकाने रिकामी करा, अन्यथा…”, ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून उत्तरकाशीत 35 दुकानदारांना धमकी
- बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आवश्यक
घोटाळेबाज नवनवीन घोटाळे करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. आता त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. व्हॉट्सअॅपशी संबंधित अनेक स्कॅम यापूर्वीही अनेकदा समोर आले आहेत. मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर अनेक स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांचे पैसे चोरण्यासाठी केला आहे. याचं कारण म्हणजे, या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं लोकांपर्यंत पोहोचणं सोपं होतंय. व्हॉट्सअॅपचे सुमारे दोन अब्ज मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत.आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन येतायत मिस कॉल्सअनेक व्हॉट्सअॅप युजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना मलेशिया, केन्या आणि व्हिएतनाम, इथोपिया यांसारख्या देशातून कॉल्स येत आहेत. परंतु, अद्याप हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, हे मिस कॉल्स का येत आहेत. परंतु, अनेकांचं म्हणणं आहे की, हा एका नव्या स्कॅमचा पार्ट आहे. काहीजण खास करुन जे नवं सिम कार्ड खरेदी करत आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन स्कॅम कॉल्स वारंवार येत आहेत.
तुम्हालाही असे स्कॅम कॉल्स येत असतील तर काय कराल?जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर असे स्कॅम कॉल्स येत असतील तर अजिबात घाबरु नका. सर्वात आधी कॉल करणाऱ्याला व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट आणि ब्लॉक करा. या नंबरवरुन येणाऱ्या मेसेजवरील कोणतीही लिंक किंवा व्हिडीओ ओपन करु नका. कारण त्या लिंकवर तुमचा डेटा किंवा तुमचे पासवर्ड, पैसे चोरण्याचा कोणत्याही प्रकारचा मॅलवेयर असू शकतो. तुम्हाला गंडा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलवर काहीतरी करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. म्हणून, युजर्सना अनोळखी कॉलरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
- पुणेरी बाप्पा ते छत्रपती संभाजी किंग्ज...! महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या संघांची नावे जाहीर, 6 जिल्हे रिंगणात
- कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
- ...तर आम्ही खपवून घेणार नाही; भारताच्या सीमाप्रश्नावरून चीन-अमेरिका भिडले
- Karnataka : Tax-paying women out of Gruha Lakshmi