वैजनाथ देवस्थान दवणा महोत्सव

वैजनाथ देवस्थान दवणा महोत्सव

belgavkar.com | belgaum | belgavkar

सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ देवस्थान

बेळगावसह सीमाभागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ देवस्थानात बुधवारपासून दवणा महोत्सव सुरू होणार आहे. तीन वर्षानंतर यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह असून यात्रा कमिटीने यात्रेचे नियोजन केले आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार वैजनाथ देवाचे आजोळ असणाऱ्या कडोली (ता. बेळगाव) येथून बुधवारी कलमेश्वर देवालयाच्या मानाच्या पालख्या भाविक पळवत वैजनाथ कडे प्रस्थान करतात. या पालख्यांसोबत कडोली येथील शेकडो भाविकांचा सहभाग असतो.
त्याच दिवशी रात्री या पालख्या देवरवाडी येथे पोहोचतील. रात्री या पालख्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात येईल. पालखीतून आरोग्य भवानी माता देवीला आणण्याची परंपरा आहे. वैजनाथ व आरोग्य भवानी माता यांच्या विवाह सोहळ्याला देवरवड येथील जाधव घराण्याची सासनकाठी वाजत गाजत उपस्थित राहते. बुधवारी मध्यरात्री 12 नंतर म्हणजेच, गुरुवारी मध्यरात्री 12.36 वाजता हस्त नक्षत्राला वैजनाथ आणी आरोग्य भवानी मातेचा विवाह सोहळा होणार आहे. यानंतर दवणा वाहण्यास प्रारंभ होईल. गुरुवारी भर यात्रेला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी दुपारी बारा ते तीन दरम्यान महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैजनाथ देवस्थान उपसमितीने केले आहे.

Davana festival at Vaijnath temple in Devarwadi Chandgad belgaum बेळगाव belgavkar belgaum

Devarwadi Chandgad Vaijnath temple dawana

वैजनाथ देवस्थान दवणा महोत्सव
सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड) येथील वैजनाथ देवस्थान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm