बेळगाव : आता तिसऱ्या रेल्वेगेटच्या दुसऱ्या बाजूलाही उड्डाणपूल उभारणार #RoB

बेळगाव : आता तिसऱ्या रेल्वेगेटच्या दुसऱ्या बाजूलाही उड्डाणपूल उभारणार #RoB

belgavkar.com | belgaum | belgavkar

येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात होणार

बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेटवर आणखी एका उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. याकरिता रेल्वे खात्याने यापूर्वीच मार्किंग केले होते. आता प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असून उड्डाणपुलाच्या उभारणीकरिता आवश्यक असलेले लोखंडी बिम आणि इतर यंत्रोपकरणे दाखल झाली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या उभारणीच्या कामास सुरुवात होणार आहे.
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागातून रेल्वेमार्ग गेला आहे. तसेच रेल्वेचा विकास केला जात असून या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. दक्षिण भागातील रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने बेळगाव परिसरातील रेल्वे ट्रॅकचा विकास होणे आवश्यक होते. त्याकरिता रेल्वेस्थानकाच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे रेल्वे फाटकावरील होणारी गर्दी आणि अपघात टाळण्याच्यादृष्टीने उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. यापूर्वी 4 ठिकाणी उड्डाणलांची उभारणी करण्यात आली आहे. खानापूर रोडची रुंदी 120 फूट असल्याने या रस्त्यावर तिसऱ्या रेल्वे फाटकावर दुतर्फा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. सध्या एका बाजूच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे काम पूर्ण होण्यास विलंब लागला होता. RoB च्या उभारणीचे काम पूर्ण करून अलीकडेच उद्घाटन करण्यात आले होते.
हे काम पूर्ण झाल्याने दुसऱ्या बाजूच्या उड्डाणपुलाची उभारणी करण्याच्यादृष्टीने रेल्वे खात्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे फाटकाच्या दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले होते. पण सध्या या उड्डाणपुलाच्या उभारणीबाबत कोणतीच माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी लोखंडी कॉलम उभारण्यात येणार आहेत. त्याकरिता लोखंडी बिम तसेच पाया खोदण्यासाठी यंत्रोपकरणे दाखल झाली आहेत. उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूस नवीन उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. त्याकरिता पाईपदेखील आणण्यात आले आहेत. लवकरच या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

rob flyover will also be constructed on the other side of the third railway gate

third railway gate rob belgavkar belgaum

third railway gate rob belgavkar belgaum belgaum

बेळगाव : आता तिसऱ्या रेल्वेगेटच्या दुसऱ्या बाजूलाही उड्डाणपूल उभारणार #RoB
येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm