बेळगाव : हुतात्मा चौक (कडोलकर गल्ली काॅर्नर) येथे बिल्डींगवरून पडून युवकाचा मृत्यू; वडीलांसमोरच मुलाचा ह्रदयद्रावक मृत्यू - आत्महत्या की अपघात...?

बेळगाव : हुतात्मा चौक (कडोलकर गल्ली काॅर्नर) येथे बिल्डींगवरून पडून युवकाचा मृत्यू;
वडीलांसमोरच मुलाचा ह्रदयद्रावक मृत्यू - आत्महत्या की अपघात...?

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : डाँक्टरांकडे वैद्यकीय उपचारासाठी हुतात्मा चौक येथे आलेल्या हिंडलगा येथील युवकाचा बिल्डींगवरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली आहे. येथील आरके आर्केड बिल्डींगवरून अचानक पडून गर्दीच्या समोर युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रोहन राजेश कुपेकर (वय 25) असे मयत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवकाला अपस्माराच्या (फिट येणं, आकडी, मिरगी) विकाराने ग्रासलेले होते. सकाळी उपचारासाठी वडिलांबरोबर तो हुतात्मा चौक येथील डॉक्टरांकडे आला होता. त्यावेळी उंच बिल्डींगच्या दुसर्या मजल्वावरील रेलींग वरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला आहे. मयत रोहन याच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. युवकाने आत्महत्या केली की हा एक अपघात होता याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांच्या अधिक तपासणीनंतर व घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर युवकाला फिट आल्याने हा अपघात घडला व युवकाचा तोल गेल्याने तो पडुन मृृृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हुतात्मा चौक (कडोलकर गल्ली काॅर्नर) येथे बिल्डींगवरून पडून युवकाचा मृत्यू; वडीलांसमोरच मुलाचा ह्रदयद्रावक मृत्यू - आत्महत्या की अपघात...?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm