बेळगाव : टीव्ही सेंटर परिसरातील बेळगाव-वन कार्यालयात चोरीची घटना घडली आहे. कुलूप फोडून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला असून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने चोरट्यांनी माञ एक लॉकर पळविल्याचे उघडकीस आले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. यासंबंधी कार्यालयाचे व्यवस्थापक नंजुडेश्वर चलवादी यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत. करंट स्वीच ऑफ करून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला आहे. या कार्यालयातील एकूण तीन कुलूप फोडण्यात आले आहेत. रोकड शोधण्यासाठी सर्व ड्राव्हर तपासण्यात आले आहेत. चोरट्यांच्या हाती 700 रुपये रक्कम लागली आहे. महत्त्वाची कागदपत्रे व आधारकार्ड असलेले एक लॉकर चोरट्यांनी पळविले आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.