VIDEO  टाईम्स स्क्वेअरमध्ये जय श्रीराम; बिलबोर्ड झळकला | अयोध्येत राम मंदिर - एकूण 9 शिळांचं पूजन

VIDEO टाईम्स स्क्वेअरमध्ये जय श्रीराम;
बिलबोर्ड झळकला | अयोध्येत राम मंदिर - एकूण 9 शिळांचं पूजन

belgavkar.com | belgaum | belgavkar

न्यूयॉर्क : अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरमध्ये राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालं. त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे प्रभ रामचंद्रांचं छायाचित्र झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र टाईम्स स्क्वेअरमधील बिलबोर्ड्सवरील जाहिरातीचं काम सांभाळणाऱ्या कंपनीनं यास नकार दिला होता. अमेरिकेतल्या मुस्लिमांनी या प्रकरणात विरोध दर्शवत मोहीम हाती घेतल्यानं जाहिरात कंपनीनं प्रभू रामाचे फोटो झळकण्यास असमर्थतता दर्शवली. मात्र आज अचानक टाईम्स स्क्वेअरमध्ये प्रभू रामचंद्र, अयोध्येतील राम मंदिर आणि भारताचा झेंडा फडकला. ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या भारतीयांना सुखद धक्का बसला.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या सोहळ्याला 175 जण हजर होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण 9 शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. 12 वाजून 44 मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 9 शिळांचं पूजन करण्यात आलं. या शिळांचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं. '1989 मध्ये जगभरातल्या भाविकांनी मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या. अशा 2 लाख 75 हजार विटा अयोध्येत आहेत. त्यातल्या 100 विटांवर जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे. त्यातल्याच 9 विटा आज इथे आणण्यात आल्या आहेत,' अशी माहिती पुजाऱ्यांनी भूमिपूजन सुरू असताना दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

VIDEO टाईम्स स्क्वेअरमध्ये जय श्रीराम; बिलबोर्ड झळकला | अयोध्येत राम मंदिर - एकूण 9 शिळांचं पूजन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm