बेळगाव : ड्रग्जवर नियंत्रणासाठी बेळगावात विशेष शिबिर;

बेळगाव : ड्रग्जवर नियंत्रणासाठी बेळगावात विशेष शिबिर;

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री श्री रविशंकर यांची घोषणा

बेळगाव : युवकामध्ये ड्रग्ज, गांजाची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी बेळगावात 6 महिन्यांचे विशेष ध्यानधारणा शिबिर मोफत भरवू, अशी माहिती योग आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केली. केएलई संस्थेच्या डॉ. व्ही. डी. पाटील सभागृहात रविशंकर यांनी निमंत्रितांसाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर ते बोलत होते. पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावमध्ये ड्रग्ज, गांजाची युवकामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे, ही कशी रोखता येईल, असा प्रश्न विचारला असता रविशंकर म्हणाले, युवक आनंद शोधण्यासाठी व्यसनांकडे वळतात. हा तात्पुरता आनंद घेऊन ते शरीराचे वाटोळे करुन घेतात. प्राणायम आणि ध्यानधारणेत मोठा आणि कायमस्वरुपी आनंद आहे.
बेळगावकरांंनी साथ दिली तर इथे मी सहा महिन्यांचे मोफत शिबिर आयोजित करण्यास तयार आहे. हे सहा महिन्याचे शिबिर पूर्ण केल्यास मी खात्री देतो युवक व्यसनापासून कायमस्वरुपी मुक्त होतील. ‘घर घर ध्यान’ पोहचवण्याची गरज आहे. अमेरिका, इग्लंडमध्ये निराशेबरोबर एकाकीपणा वाढत आहे. आत्महत्येेचे प्रमाण वाढत आहे. यासाठी त्यांच्या विद्यापीठात आता ध्यानधारणांची शिबीरे घेतली जातात. ध्यानधारणा केवळ साधू-संतांसाठी नाही, तर ती सर्वांसाठी आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या देणगीचा आपण पूरेपूर वापर केला पाहिजे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ड्रग्जवर नियंत्रणासाठी बेळगावात विशेष शिबिर;
श्री श्री रविशंकर यांची घोषणा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm