मेहंदी लावल्यामुळे 9 वर्षाच्या मुलीला मिरगी, विचित्र प्रकरणामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत

मेहंदी लावल्यामुळे 9 वर्षाच्या मुलीला मिरगी, विचित्र प्रकरणामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत

belgavkar.com | belgaum | belgavkar

जेव्हा या मुलीने मेहंदी लावली तेव्हा तिला प्रथम क्रॅम्प आला

लग्न असोत किंवा कोणताही कार्यक्रम, महिलांमध्ये मेहंदी लावण्याचा क्रेज आहे. मेहंदीची चांगली डिझान हातावर काढणं महिलांना आवडते. तसेच मेहंदी लावण्याचे अनेक फायदे देखील सांगितले गेले आहेत. पण असं असलं तरी सैंदर्याचं साधन असलेली ही मेहंदी एका 9 वर्षाच्या मुलीसाठी धोकादायक घडली. नवी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी सांगितले की, नऊ वर्षांच्या मुलीच्या हाताला मेहंदी लावल्याने तिला मिरगीचा झटका आला. हे असामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मेहंदी लावल्यानंतर मुलीला एपिलेप्टिक फिट किंवा मिरगी येत असल्याचे असल्याचे पालकांनी सांगितले. जेव्हा या मुलीने मेहंदी लावली तेव्हा तिला प्रथम क्रॅम्प आला, 20 सेकंदानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर वर्षभरानंतर पुन्हा मेहंदी लावल्यानंतर तिला असेच दोन झटके आले. ज्यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात आणले.
येथे न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. सेठी यांनी मुलीच्या या केसवर काम केले. त्यांच्यासाठी ही एक अनोखी घटना आहे. जी अगदी असामान्य आहे. ते म्हणाले की हे रिफ्लेक्स एपिलेप्सीचे एक असामान्य प्रकरण होते, जेथे वासामुळे या मुलीली फिट किंवा मिरगी येऊ लागली. पण तर इतर अपस्माराचे किंवा मिरगीचे दौरे सहसा मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने येतात असेल त्यांनी सांगितले डॉक्टरांनी जेव्हा या मुलीला मेहंदी लावलेला हात तिच्या छातीजवळ आणला तेव्हा तिला पुन्हा झटके येऊ लागले. तेव्हा डॉक्टरांना या केसचं निदान झालं. सुगंधामुळे एपिलेप्सी ट्रिगर करण्याचे हे एक असामान्य प्रकरण आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मेहंदी लावल्यामुळे 9 वर्षाच्या मुलीला मिरगी, विचित्र प्रकरणामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत
जेव्हा या मुलीने मेहंदी लावली तेव्हा तिला प्रथम क्रॅम्प आला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm