स्मृती इराणींची मुलगी बांधणार लग्नगाठ; 500 वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये पार पडणार लग्नसोहळा

स्मृती इराणींची मुलगी बांधणार लग्नगाठ;
500 वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये पार पडणार लग्नसोहळा

belgavkar.com | belgaum | belgavkar

हा किल्ला 500 वर्ष जुना आहे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शेनेल इराणी (Shanelle Irani) ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. शानेले ही अर्जुन भल्लासोबत लग्नगाठ बांधणार आहे. राजस्थानमधील नागौर येथील खिमसार फोर्टमध्ये  शेनेल आणि अर्जुन यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. शेनेल  आणि अर्जुन यांच्या विवाह सोहळ्याआधी काही प्री-वेडींग कार्यक्रम देखील पार पडणार आहेत.  स्मृती इराणी यांची मुलगी  शेनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांचा विवाह सोहळा राजस्थानमधील नागौर येथील खिमसार फोर्टमध्ये (Khimsar Fort) पार पडणार आहे.
हा किल्ला 500 वर्ष जुना आहे. हा किल्ला 1523 मध्ये बांधण्यात आला होता. या किल्ल्यामध्ये 68 खोल्या आहेत. 7  ते 9 फेब्रुवारी दरम्यान या किल्ल्यामध्ये शेनेल आणि अर्जुन यांचे प्रीवेडींग कार्यक्रम पार पडतील, असं म्हटलं जात आहे. शेनेल इराणीच्या विवाह सोहळ्यासाठी या किल्ल्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हा किल्ला राजस्थानमधील सर्वात आलिशान ठिकाणांपैकी एक आहे.
कोण आहे स्मृती इराणी यांचा होणारा जावई? 
अर्जुन हा कॅनेडामधील टोरोंटो येथे राहतो. अर्जुन सध्या लंडनमध्ये एमबीएचे (MBA) शिक्षण घेत आहे. तर शेनेल ही वकिल आहे. तिनं मुंबईमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. अमेरिकेतील जॉर्ज टाउन यूनिवर्सिटीमध्ये शेनेलने वकिलीचे शिक्षण घेतले.  
2021 मध्ये झाला अर्जुन आणि शेनेलचा साखरपुडा 
2021 मध्ये शेनेल आणि अर्जुन यांचा साखरपुडा झाला. स्मृती इराणी यांनी शेनेल आणि अर्जुन यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये अर्जुन हा शेनेलला  अंगठी घालताना दिसत आहे. अर्जुन आणि शेनेलचा हा फोटो शेअर करून स्मृती यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'अर्जुन भल्ला तुझे आमच्या कुटुंबात स्वागत करते. तुम्हा दोघांना शुभेच्छा'  ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेमुळे स्मृती इराणी यांना विशेष लोकप्रिया मिळाली. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून राजकारणात एन्ट्री केली. 2003 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

स्मृती इराणींची मुलगी बांधणार लग्नगाठ; 500 वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये पार पडणार लग्नसोहळा
हा किल्ला 500 वर्ष जुना आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm