बेळगाव : तंगडी गावाजवळ दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

बेळगाव : तंगडी गावाजवळ दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-अथणी : तंगडी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. सचिन दादासाहेब संकपाळ (वय 33, रा. मदभावी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री झाला. याबाबत माहिती अशी, मृत सचिन संकपाळ हा बेळगाव येथे केएलई दवाखान्यात काम करत होता. कामावरून बेळगावहून अथणीमार्गे आपल्या गावी मदभावीला जात होता.
तंगडी-शिनाळ रस्त्यावर दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाल्याने तो जागीच ठार झाला. अथणी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. मृत सचिनच्या मागे पत्नी, मुलगी, आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तंगडी गावाजवळ दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm