बेळगाव : बेळगावात पहिल्यांदाच बालनाट्य संमेलनाचे आयोजन

बेळगाव : बेळगावात पहिल्यांदाच बालनाट्य संमेलनाचे आयोजन

belgavkar.com | belgaum | belgavkar

अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित

बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा या उद्देशाने

बेळगाव : मुंबई येथील बालरंगभूमी अभियान संस्थेतर्फे शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 रोजी बेळगावात पहिल्यांदाच बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अ. भा. मराठी नाट्यपरिषदेची बेळगाव शाखा व बेळगाव येथील फुलोरा या संस्थांच्या सहकार्याने संत मीरा 'हायस्कूलमध्ये सदर बाल नाट्यसंमेलन होणार आहे. या संमेलनाला चित्रपट अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित यांची प्रमुख उपस्थिती आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी मीना नाईक आहेत, अशी माहिती मुंबई येथील बालरंगभूमी अभियानच्या या संस्थेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी दिली. दि. 18 रोजी दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर बेळगाव येथील कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाटके सादर करण्यात येणार आहेत. दि. 19 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा होईल. या संमेलनात 300 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सांगता कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, अभिनेते प्रसाद पंडित उपस्थित राहणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगावात पहिल्यांदाच बालनाट्य संमेलनाचे आयोजन
अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm