बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तब्बल इतक्या महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तब्बल इतक्या महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली

belgavkar.com | belgaum | belgavkar

मटण पार्टी वाया गेली -डीसीसी बँक - DCC Bank Election

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची (District Co-operative Central Bank - DCC - डीसीसी) निवडणूक पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून, ही निवडणूक आता डिसेंबर-2020 किव्हा त्यानंतर होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तब्बल पाच महिन्यांसाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेची 7 ऑगस्ट रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली. आतापर्यंत या बँकेची निवडणूक तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार काडाच्या उपप्रशासकीय अधिकारी जयश्री शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
कोरोना व्हायरस व लॉकडाऊनमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सहकार खात्याकडून निवडणूक निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी म्हणून बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांची नियुक्ती झाली. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. निवडणूक यापूर्वी जाहीर करण्यात आल्याने मोर्चे बांधणी सुरु होती. तसेच अनेकांनी मटणाच्या पार्ट्याही दिल्या होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार केली जात आहे. यासाठी डीसीसी बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहकारी संघांना माहिती पुरविण्याचे आवाहन बँकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. वेळत माहिती न दिल्यास संघ मतदानापासून वंचित राहील. अन् त्यास बँक जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डीसीसी बँकेची निवडणूक 27 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित केले होते. निवडणूक अधिकारी म्हणून सईदा यांनी कच्ची मतदार यादी तयार करण्यासंबंधीचे पत्रक प्रसिद्धीस दिले होते. यात 31 मार्च 2020 च्या आधीची सदस्यांची थकबाकी, वसुली आदींच्या माहितीसह सहकारी संघ व बँकांना निवडणुकीशी संबंधीत सर्व माहिती द्यावी लागणार आहे. 30 जूनपूर्वी माहिती देणाऱ्या पतसंस्थांचीच नावनोंदणी केली जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तब्बल इतक्या महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली
मटण पार्टी वाया गेली -डीसीसी बँक - DCC Bank Election

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm